लग्नात उशिरापर्यंत डीजे वाजवणे आले अंगलट; थेट तुरूंगात रवानगी

0

मनमाड(प्रतिनिधी) ता. २५ : लग्न कार्यसाठी रात्री उशीरा पर्यंत वाजविण्यात येत असलेले डीजे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर अरेरावी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ६ जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

या सर्व आरोपींना कोर्टात हजर केल्या नंतर त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती त्या नंतर या आरोपींची नाशिकच्या सेन्ट्रल जेल मध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली.

या प्रकरणी डीजे ही जप्त करण्यात आल्याचे बहिरट यांनी सांगितले.रात्री उशिरा पर्यंत डीजे वाजविणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी प्रथमच कडक कारवाई केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील एका शाळेत लग्न कार्य निमित्त हळदीचा कार्यक्रमासाठी रात्री उशिरा पर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविण्या बरोबरच तरुणाचा धिंगाणा सुरु होता.

डीजेच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत होता त्यामुळे त्यांनी पोलीस स्थानकाशी संपर्क साधून डीजे बाबत तक्रार केल्या नंतर रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे घटनास्थळी गेले व त्यांनी डीजे बंद करण्यास सांगितले.

मात्र काही तरुणांनी डीजे बंद करण्यास नकार तर दिलाच शिवाय पोलीस अधिकाऱ्या सोबत अरेरावी देखील केली.

याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाल्या नंतर ते घटनास्थळी गेले व त्यांनी डीजे बंद करण्यास नकार देवून पोलीस अधिकाऱ्याशी अरेरावी करणाऱ्या ६ जणांना अटक करून त्याच्या विरुद्ध भादवी३५३.३३२,३२३,१४३,१४७,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केल्या नंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

कोर्टाने या आरोपींना २ दिवसाची पोलीस कोठडी दिली होती त्या नंतर या सर्व ६ जणांची नाशिकच्या सेन्ट्रल जेल मध्ये रवानगी करण्यात आल्याचे पो.नी.बहिरट त्यांनी सांगीतले

शहर परिसरात लग्न, वाढदिवस, उत्सव,जयंती आदी साजरी करण्यासाठी डीजे लावले जातात मात्र काही वेळा डीजे रात्री उशिरा पर्यंत वाजविले जातात.

डीजेच्या आवाजाचा सर्वात जास्त त्रास हा वय वृद्ध,लहान मुळे,आणि आजारी माणसाना जास्त होती विशेषतः हार्ट पेशंटला डीजेच्या आवाजाचा खूप त्रास होतो मात्र जे लोक आनंदोत्सव साजरा करतात ते हे विसरतात कि डीजेचा लोकांना किती त्रास होतो.

रात्री उशिरा पर्यंत आणि लोकांना त्रास होईल अशा आवाजात डीजे वाजविणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले

LEAVE A REPLY

*