संक्रांतीनिमित्त नवीन नाशकात पतंगबाजीचा उत्साह

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी):- मकर संक्रांतीच्या सणाला तीळ गुळाइतकेच महत्व पतंगाला असते. किंबहुना संक्राती म्हणजे अबाल-वृद्धांसाठी पतंगबाजीची पर्वणीच असते.

या पर्वणीला व्यावसायिक रूप प्राप्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पतंग व्यावसायिकांचे व्यवसाय जोमाने सुरू असल्याचे चित्र नवीन नाशिक परिसरात दिसत आहे.

आजचा दिवस या आंनदोत्सवासाठी खास असल्याने सकाळपासूनच पतंगाची दुकाने खरेदीदारांच्या गर्दीने ओसंडली आहेत.

मकर संक्रांती, त्यात रविवारची सुट्टी असल्याने या आंनदोत्सवाला चांगलेच भरते आले आहे. मात्र वातावरणात हवेचा वेग फारसा नसल्याने पतंगबाजांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

LEAVE A REPLY

*