उन्हाळ्यात लस्सी वुईथ आईस्क्रिमकडे नाशिककरांचा ओढा

0
नाशिक | प्रतिनिधी- उन्हाचा पारा चढल्यावर लस्सीप्रेमी नाशिककर ‘लस्सी शॉप मधील लस्सींची चव घेत ‘कूल कुल’ होत आहेत. अस्सल दह्यापासून तयार केलेली मलाईदार लस्सी आणि त्यामध्ये आईस्क्रिमचे रंगीबेरंगी स्कूप त्यावर पौष्टीकतेसाठी सुकामेव्याची साखर पेरणी हे पाहून क्या बात है असे उच्चार न निघाले तर नवल. वाढत जाणार्‍या गरमीत नाशिककर लस्सीप्रेमी लस्सीशॉपमध्ये जात ‘कूल’ फंडा वापरताना दिसत आहेत.

नवीन पंडित कॉलनीत आनंद लाँड्रीसमोर चंद्रकंस अपार्टमेंटच्या तळमजल्यावर अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेले लस्सी शॉप म्हणजे अस्सल लस्सी मिळण्याचे एकमेव ठिकाण.

लस्सी शॉपीचे संचालक अभिजीत पारीक यांचे आजोबा रामजीवन पारीक यांनी ७५ वर्षांपूर्वी वैजापूरमध्ये सर्वप्रथम पारीक कोल्ड्रींक या नावाने व्यवसायाला प्रारंभ केला होता. तो ब्रॅण्ड, तीच चव आणि तोच विश्‍वास नाशिकमध्ये रुजण्यासाठी खास नाशिककरांच्या आग्रहास्तव अभिजीत यांनी या ‘कुल’ व्यवसायाची रुजुवात केली.

त्याकाळात त्यांच्या आजोबांनी अनेक पिढ्यांना त्यांच्या चविष्ट आणि मलाईदार लस्सीने तृप्त केले आहे. आता तोच अस्सलपणा नातू अभिजीत आज नाशिककरांना देत आहे. थंडाईच्या शोधात असणार्‍यांना एक नवा उत्तम पर्याय ‘लस्सीशॉप’मधून उपलब्ध झाला आहे. नाशिककर लस्सीप्रेमींना या अस्सल लस्सीचा स्वाद भावल्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते.

लस्सी शॉपमध्ये लस्सी, आईस्क्रिमसह दही खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. येथील प्रसन्न वातावरण, स्वच्छता आणि ग्राहकांची आवड लक्षात घेऊन दिले जाणारे पर्याय, आदरातिथ्य उत्तम आहे. म्हणुनच लस्सीशॉप तरुणाईसह नाशिककरांचे ‘कूल’ ठिकाण झाले आहे. थंडाव्याच्या शोधात येथे येणारा तृप्त होऊन बाहेर पडतो पुन्हा येथे येण्याच्या इराद्यानेच….! शुभ्र मलाईदार लस्सी त्यावर आईस्क्रिम, सुकामेव्याची सजावट आणि जिभेला सुखावणारी चव यामुळे तुम्हीही ‘कूलकूल’ व्हाल.

छोटू , मोटू स्वाद लाजवाब

लस्सीशॉपमध्ये ‘छोटू’ आणि ‘मोटू’ अशा दोन आकारात अस्सल लस्सीचा आनंद चाखता येतो. लस्सीमध्ये आईस्क्रिम त्यावर सुकामेव्याची सुरेख पेरणी पाहताच क्षणी लस्सीप्रेमींच्या तोंडाला पाणी न आले तर नवल? आणि ंलस्सीची चव म्हणाल तर लाजवाबच!..

अस्सल लस्सीचा स्वाद

लस्सीमध्ये कुठलाही फ्लेवर मी टाकत नाही. पंजाबची ओळख असलेल्या लस्सीमध्ये कुठलाही बाह्य स्वाद, फ्लेवरची मुळी गरजच नसते. लस्सीला स्वत:ची अशी खास चव आहे म्हणून तर तीला वेगळपण आहे. ती लस्सीसारखी असावी. अननस, अंबा अशा फळांचा ‘प्रिर्झव्हीटीव्ह’ पल्प, पेस्ट लस्सीमध्ये मिसळला तर तिचा मुळ स्वाद हरवतो आणि हेच आम्हाला नको होते. म्हणूनच आम्ही घरी विरजन लावलेल्या दह्यापासून अस्सल लस्सी तयार करतो. त्यामध्ये कुठलेही कृत्रिम रंग अथवा प्रिर्झव्हिटीव टाकत नाही. हेच आमचे ‘यूएसपी’ आहे.

-अभिजीत पारीक, संचालक, लस्सी शॉप

LEAVE A REPLY

*