कृषीथॉनमधील चर्चासत्रांत डाळिंब शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0

नाशिक (प्रतिनिधी) : सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून लढत असतात, त्याचप्रमाणे शेतकरीदेखील समाजासाठी लढत असतात, असे उद्गार आ.डॉ. सुधीर तांबे यांनी “कृषीथॉन २०१७” ह्या कृषीप्रदर्शनात काढले.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दुपारच्या सत्रात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांच्या ह्याच समस्यांचे समाधान या कार्यक्रमातून करण्यात आले.

बिगर सरकारी पातळीवर होणारे संशोधन हे अधिक महत्वाचे आहे. शेती क्षेत्रामध्ये अनेक संकटे येत असतात, त्यामुळे अर्थकारण धोक्यात येते आहे, असे प्रतिपादन प्रा. अशोक सोनवणे यांनी केले. या परिसंवादासाठी तज्ञ म्हणून अशोक तावरे, डॉ.बाबासाहेब गोरे, डॉ.मिलिंद जोशी, मनोहर देवरे, प्रमोद पाटील, अरुण देवरे, प्रमोद देशमुख, शशिकांत आहिरे, अमित दिघे, विष्णू रहातक या मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर उत्तर दिले.

डाळिंब शेतीतील निर्यात व्यवस्था ४००मिलीहून कमी पाउस असणाऱ्या ठिकाणी असावे, असेही गोरे यांनी यावेळी सुचवले. पिकांवर कीड आल्यानंतर पर्याय शोधण्याऐवजी प्रतिबंधक उपाय शोधायला हवे, असे प्रतिपादन डॉ.मिलिंद जोशी यांनी केले. डाळिंब शेतीचा दर्जा घसरत चालला आहे. त्याचबरोबर डाळींबमध्ये अधिक वाण देखील नाही.

विदेशी मार्केटमध्ये ३५० ग्रा.म.हा डाळिंब असणे आवश्यक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या समस्येकडेही लक्ष द्यावे असे प्रतिपादन मनोहर देवरे यांनी केले. जास्त पाऊस असणाऱ्या ठिकाणी लवकर काढणीला येणारे पिक घ्यावे,जमीन व वातावरण यांच्यानुसार वाण निवडावा, लागवडीचे अंतर विद्यापीठ व एनआरसी ने सुचविल्याप्रमाणे असावे, असे प्रमोद देशमुख यांनी म्हटले.

“कृषीथॉन डाळिंब शेती परिसंवाद” ह्या कार्यक्रमाद्वारे विशेष सन्मान सोहळादेखील पडला. आ.डॉ सुधीर तांबे व प्रा. सुनील वानखेडे यांच्या हस्ते हे सन्मान देण्यात आले. अशोक तावरे (बारामती), डॉ.बाबासाहेब गोरे, डॉ. मिलिंद जोशी(बारामती), मनोहर देवरे(सटाणा), अमित दिघे(लोणी, प्रवरा), प्रमोद पाटील, अरुण देवरे(महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संशोधक), विष्णू रहातक(प्रगतशील डाळिंब उत्पादक) यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

*