राष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धेत नाशिकच्या किरण गुंजाळची निवड

0

गणुर (वार्ताहर) : लवकरच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी  येथील लासलगाव महाविद्यालयातील विद्यार्थी किरण दत्तू गुंजाळची निवड झाली आहे. राज्यस्तरिय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय पातळीवर प्रवेश केला आहे.

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

संपूर्ण राज्यातून आलेल्या 9 विभागाच्या खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होत चुरस निर्माण केली. 1 ते 4 डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत नासिक विभागाच्या खेळाडूने आपल्या सरस कामगिरीच्या आधारावर 19 वर्षां आतील मुलाचे विजेतेपद मिळवून दिले

त्यामुळे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी  ६२ किलो वजनी गटात  याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगांव ता निफाड, जि नाशिक येथील तो विद्यार्थी आहे. त्याला दिनेश नाईक, नारायण जाधव, गणेश जाधव, श्री. देवरे, श्री शेलार, श्री गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*