आरटीओच्या कारवाईने शेतकर्‍यांचे नुकसान

0

कळवण। द्वारकाधीश कारखान्यावर ऊस घेऊन जाणार्‍या ऊसाच्या ट्रकवर मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्याच्या कारणास्तव दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र या कारवाईत शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. दंड भरे पर्यंत गाडी उभी राहणार असल्याने वजनात घट होऊन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.

कसमादे परिसरात सध्या ऊसतोडीचा हंगाम जोमात सुरु झाला आहे. सालाबादाप्रमाणेच ऊसाची वाहतूक करणारे ट्र्क चालक मालक गाडीत माल भरत आहेत. असे असताना मालेगाव परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांनी थेट कळवण गाठत द्वारकाधीश साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणार्‍या ट्रकवर क्षमतेपेक्षा जास्त माल गाडीत असल्याचे कारण दखवत ऊस वाहतूक करणार्‍या ट्रक मालक चालकावर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे.

सर्व कारवाई झालेल्या ट्रक ह्या परिवहन महामंडळाच्या म्हणजे बस डेपोत जमा केल्या आहेत. या कारवाईत शेतकरी बांधवाचे मोठे नुकसान होत आहे. जो पर्यंत ट्र्क चालक परिवहन अधिकार्‍याने केलेला दंड मालेगाव कार्यालयात भरत नाही तो पर्यंत या गाड्या कारखान्यावर नेता येणार नाहीत. त्यामुळे ऊसाचे वजन कमी होऊन अथवा ऊस चोरी जाऊन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.

LEAVE A REPLY

*