जिल्हा कबड्डी दिन पुरस्कारांचे मनमाडला वितरण

0

मनमाड, ता. ९ : कोणत्याही खेळाचा गुणात्मक दर्जा वाढवायचा असेल तर त्यासाठी दर्जेदार प्रशिक्षक तयार करणे गरजेचे आहे असे मत नाशिक जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हा कबड्डी दिन पुरस्कार वितरण सोहोळ्याप्रसंगी मंचावरून व्यक्त केले.

सहाव्या जिल्हा कबड्डी दिनाचे आयोजन शनिवार दि. ९ जून रोजी पल्लवी मंगल कार्यालय मनमाड येथे सकाळी ११ वाजता जिल्हा कबड्डी असोशिएशनचे प्रमुख कार्यवाह राजेंद्र पगारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा कबड्डी असोशिएशन व समता क्रीडा मंडळ, मनमाड यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे सहसचिव प्रकाश बोराडे, जिल्हा कबड्डी असोशिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, उपाध्यक्ष प्रा. शिरीष नांदुर्डीकर, नगरसेवक कैलास गवळी, विनय आहेर, संतोष अहिरे, समता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वाल्मिक बागुल, सुभाष बहोत, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, मनमाडचे प्राचार्य आर. पी. भामरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रात जर भारताला आजतागायत अपेक्षित असे यश प्राप्त करता आलेले नाही त्याचे मुलभूत कारण म्हणजे तांत्रिक दृष्ट्या सक्षम असलेल्या दर्जेदार प्रशिक्षकांचा अभाव व क्रीडा सुविधांचा अभाव हेच म्हणावे लागेल. कबड्डी खेळाचा दर्जा वाढवायचा असेल तर जिल्हा कबड्डी असोशिएशनने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी प्रशिक्षक तयार करावेत.

त्यासाठी लागणारे सर साहित्य हे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून जिल्हा संघटनेला दिले जाईल असे आश्वासन या कार्यक्रमप्रसंगी रविंद्र नाईक यांनी दिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा कबड्डी असोशिएशनचे प्रमुख कार्यवाह यांनी जिल्हा कबड्डी असोशिएशनचा प्रवासाबद्दल माहिती देताना ही खंत व्यक्त केली की जिल्हा संघटना खेळाच्या व खेळाडूंच्या विकासासाठी सर्वोतोपरी तयारी दाखवत असतांनाही जिल्ह्यातील संघटक व खेळाडू पुढे यायला तयार नाही. यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडा शिक्षक व खेळाडू यांनी पुढे यावे असेही आवाहन त्यांनी केले.

पुरस्कार्थींच्या वतीने माजी राष्ट्रीय खेळाडू नितीन पाटील यांनी आपल्या मनोगतात मनमाड हि खऱ्या अर्थाने कबड्डीची पंढरी आहे व राहील. मनमाडच्या क्रीडा प्रेमींनी मी खेळत असतांना मला भरभरून प्रेम दिले. मोहन गायकवाडांनी आपले परखड मनोगत व्यक्त केले त्यावरून कबड्डी महर्षी बुवा साळवींची इथे आठवण झाली.

३० वर्षानंतर पुन्हा कबड्डीच्या व्यक्तींना भेटता आले त्याचाही मला आनंद झाला. आताची कबड्डी एवढी प्रगत झाली आहे की आता आपण इथे खेळायचे झाले तर खेळू शकतो का अशी शंका निर्माण होते. या ठिकाणी खंत व्यक्त करावी लागते की पूर्वी एकट्या महाराष्ट्रात कबड्डीच्या ४०००० हून जास्त खेळाडूंना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाल्या होत्या परंतु आज मोजक्याच खेळाडूंना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहे. किंबहुना प्रो-कबड्डीमुळे बोटावर मोजण्याइतपत खेळाडूंना पैसा उपलब्ध होत आहे हि प्रगती आहे की अधोगती हे ही याठिकाणी बघणे गरजेचे आहे.

अध्यक्षीय भाषणात राजेंद्र पगारे यांनी या पुरस्काराने जुन्या खेळाडू, संघटक व संस्थांना उर्जा मिळून पुन्हा ते कबड्डीशी निगडीत होतील त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना त्याचा फायदा होईल त्याप्रमाणे आता खेळाडूंचे सुद्धा प्रबोधन करणे गरजेचे आहे. असे मनोगत यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कार्थींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच सतीश सुर्यवंशी, डॉ.रविंद्र मोरे, यांनी केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील नामवंत जेष्ठ कबड्डीपटू प्रमोद भालेराव, विजय उदावंत, सतीश सोनवणे, मधुकर खैरनार, कैलास भांगरे, शरद पाटील, विलास पाटील, विलास हुकीरे, रविंद्र खैरे, मेघनाथ माळोदे, मनीष पगारे, विनोद मार्तंड, अश्विनी तांबट, रत्ना तांबट, संदीप कदम, त्याचप्रमाणे वेटलिफ्टिंग चे सचिव तथा राष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, प्रा. दत्ता शिंपी, अनेक खेळाडू, क्रीडाप्रेमी, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाल्मिक बागुल, योगेश पाटील, चेतन सुतार, प्रभाकर कोल्हे, सुभाष बहोत, आनंद चाबुकस्वार, राजेंद्र निकुंभ, रोहन बागुल, ललित रणदिवे व समता क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

*