गोविंदनगर रस्त्यावर भरधाव कारचे टायर फुटून अपघात

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) ता. २९ : सिटीसेंटर मॉल ते गोविंदनगरच्या रस्त्यावर वाहनांच्या भरधाव वेगामुळे सतत अपघात होत असून  बुधवारी दुपारी या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारी (एमएच १५ सीएम ८७८१) या गाडीचे टायर फुटल्याने ही गाडी दुभाजकावर आदळून पलटी झाली.

या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी अंतर्गत सुरक्षा यंत्रणेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.

सिटीसेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसल्याने वाहने अमर्याद वेगाने धावत असतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच लहान मोठे अपघात घडत असतात.

बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जात असतानाच या गाडीचे टायर फुटल्याने ही गाडी लगतच्या दुभाजकावर आदळली. या गाडीत वाहनचालकासह एक महिला असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती नागरिकांनी पोलीसांना दिली असता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त गाडी या ठिकाणाहून हटविली. गाडीतील एअर बॅग उघडल्याने या दोघांचा जीव वाचल्याचे पोलीसांनी सांगितले असले तरी याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

*