गॅस एजन्सींकडून जनतेची आर्थिक लूट

वाढीव पैसे घेत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

0
बोरगाव । वार्ताहर- सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी गॅस धारकाकडुन गॅस एजन्सी ठेकेदार हे वाढीव पैसे घेत असून गॅस धारकांची आर्थिक लुट केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सखोल चौकशी करुन कार्यवाही करावी अशी मागणी गॅस धारकांनी केली आहे. आदिवासी गॅस धारकांकडुन गॅस एजन्सी ठेकेदार हे वाढीव पैसे घेत असुन गॅसच्या नावाखाली जनतेची आर्थिक लुट केली जात आहे.

आदिवासी जनता गरिब असुन कसतरी दोन पैसे मिळाले म्हणून त्यांच्या नशिबात गॅस आला. गॅससाठी दिंडोरी , निफाड, नाशिक, लासलगाव, पिंपळगाव येथे मिळेल तेथे उन वार पाऊस याची तमा न बाळगता काम करून पैसे आणतात. सुरगाण्यात अजुनही उदरनिर्वाहचे साधन उपलब्ध नाही, तर प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजना ही भारत देशात सुरू केली परंतु गॅस वितरण ठेकेदार याच्या संगनमताने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

यामध्ये देवळा तालुक्यातील उमराणे येथिल विश्वकमल भारत गॅस एजन्सी तसेच पेठ तालुक्यातील श्रीराम एच.पी गॅस एजन्सी धारक आदिवासी भागातील गॅस ग्राहकांचा अज्ञानाचा चांगलाच फायदा घेताना दिसतात. सध्या सरकारी दराप्रमाणे आज एका गॅसची टाकीची किमत 638.5 रूपये आहे, परंतु शेजारील देवळा, पेठ तालुक्यातून गॅस एजन्सी धारक हे त्यांच्या मनमानी पद्धतीने 830 ते 900 रूपये इतके घेतात.

बाहेरून येणारे एजन्सीकडून गॅस धारकांना पुस्तक, एसपी पेपर दिले जात नाही. म्हणून गॅस धारकांना एका गॅसची टाकी किती रूपयात भरून मिळते. सरकारी किंमतीप्रमाणे मिळते कि नाही हे एजन्सी धारक काहीच समजु देत नाही. या दोन्ही एजन्सीकडून जवळपास अंदाजे पाच ते सात हजार गॅस धारक आहेत. या सर्व गॅस धारकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. आदिवासी जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. याबाबत वरिष्ठांनी सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी गॅस धारकाकडुन होत आहे.

गॅस धारकांना न्याय मिळवून देणार

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गोरगरीब गॅस ग्राहकांची विश्वकमल भारत गॅस एजन्सी उमराणे( ता देवळा) तसेच श्रीराम एच .पी. गॅस एजन्सी( ता. पेठ )ही जर का सरकारी दरापेक्षा जास्त भावाने विक्री केली जाते. आदिवासी बाधवाची फसवणूक करत असल्याबाबत गॅस ग्राहकांच्या तक्रारी असल्याने या बाबत वरिष्ठ विक्री अधिकारी काबरा साहेब याच्याकडे दुरधनीवरून तक्रार करूनही काना डोळा करत आहे.

त्या संबधित एजन्सी वर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही तरी येत्या पाच दिवसात संबधित एजन्सीकडून सुधारणा झाली नाही तर सुरगाणा. पळसन. बार्‍हे, उबरठाण. बर्डीपाडा.बोरगाव. अशा ठिकठिकाणी जन आंदोलन उभे करून आदिवासी गोरगरीब गॅस धारकाची फसवणूक केली जाते ती थांबवण्याचा पयत्न केला जाईल. व आदिवासी गॅस धारकांना न्याय मिळवून दिला जाईल.

-एन.डी.गावित, सदस्य -पंचायत समिती सुरगाणा

वाहन भाड्याची वसुली

सध्या आताचे एक गॅस टाकीची सरकारी भाव 658 रुपये एवढी आहे. परतु उमराणे (ता. देवळा) ते बर्डीपाडा अतर हे 150 किलोमीटर असुन आमच्या एका गाडीत 80 गॅस टाक्या घेतल्या जातात या गाडीचे भाडे 4000 रूपये आम्ही देतो. गॅस पोहचविण्यासाठी मजूरांची हमाली 50 रुपये असते .म्हणून हा खर्च आम्हाला गॅस ग्राहकांचा कडुन घेणे गरजेचे आहे.

-प्रशांत देवरे, विश्वकमल भारत गॅस एजन्सी उमराणे (ता. देवळा)

LEAVE A REPLY

*