आदिवासी विभागाच्या नोकरीसाठी बेरोजगाराची दीड लाखाची फसवणूक

0

नवीन नाशिक, ता. १ : आदिवासी विकास खात्यात शॉर्टकटच्या माध्यमातून झटपट नोकरीचे स्वप्न कासारी, ता. नांदगाव येथील बेरोजगार तरुणाच्या चांगलेच अंगलट आले.

नोकरीच्या आमिषाने पाच जणांनी त्याला दीड लाखाला गंडा घातला. त्यापैकी एक प्राथमिक शिक्षक आहे. तर एक नाशिकच्या आदिवासी विकास भवन येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. या सर्व संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

संदीप बाळू सानप असे फसवणूक झालेल्य बेरोजगाराचे नाव आहे. सरकारी नोकरीच्या उद्देशाने सोमनाथ विठ्ठल डाबल ( ३५, मजुरी,  शांतीनगर, मखमलाबाद रोड नाशिक), राजेश राम रोहिडा ( ४२, सिक्युरिटी गार्ड, दत्तनगर, पेठरोड, नाशिक), राजेंद्र सहदेव मोरे ( ४५, प्राथमिक शिक्षक, रा. लक्ष्मीनगर, मालेगाव रोड, नांदगाव, जि. नाशिक), हेमचंद्र विष्णू अहिरे ( ६२, क्रांतीनगर, मखमलाबाद , पंचवटी, नाशिक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर साहेबराव रामभाऊ शेवाळे ता. नांदगाव, जि. नाशिक हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

या सर्वांनी नोकरीच्या आमिषाने फिर्यादी सानप यांच्याकडून साडेसात लाख रुपये मागितले होते. पैकी दीड लाख सानप यांनी त्यांना दिले व उर्वरित रक्कम नोकरी मिळाल्यावर द्यायचे ठरले.

त्यानंतर या पाचही जणांनी आदिवासी विकास भवन येथील अधिकारी असल्याचे सांगून तेथील सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून तरुणाची मुलाखत घेतली आणि बनावट सही शिक्क्यांनी बनावट नियुक्ती पत्र त्याला दिले.

मात्र प्रत्यक्षात आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यावर सानप यांनी तक्रार नोंदविली.

LEAVE A REPLY

*