अवकाळी पावसानंतर उन पडल्याने पिक वाचविण्यासाठी बळीराजाची धडपड

0

दिंडोरी, ता. ६ : कालच्या अवकाळी पावसानंतर आज पेठ, सुरगाणा, दिंडोरी परिसरात ऊन पडल्याने वावरातील नागली, भात, वरईचे भारे सुरक्षित स्थळी हलविण्यात शेतकरी सकाळपासून व्यस्त आहे.‍

काळ आलेल्या पावसामुळे काढणी केलेला भात, वरई, नागली या पिकांचे भिजल्याने नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करून पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

ओखी वादळानंतर नाशिक जिल्हयात निर्माण झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ स्थितीनंतर आज सकाळपासून वातावरण पूर्ववत होत आहे.‍

हे चित्र असेच कायम राहिल्यास सुगीच्या कामांना वेग येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*