महानिर्मितीच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

0

एकलहरे । दि. 25 वार्ताहर
येथील औष्णिक विद्युत केंद्रातील शक्तिमान क्रीडा संकुल येथे महानिर्मितीच्या आंतर विद्युत केंद्र बाह्यगृह क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला असून यातील क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिला सामना मुख्य कार्यालय मुंबई आणि पोफळी जल विद्युत केंद्र यांच्यात खेळला गेला. हा सामना पोफळी संघाने 50 धावांनी जिंकला.

याप्रसंगी, उपमुख्य अभियंता राजेंद्र खानापुरकर, सुनिल इंगळे, अधिक्षक अभियंता राकेशकुमार कमटमकर, मनोहर तायडे, देवेंद्र माशाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेत नाशिक, कोराडी, खापरखेडा, चंद्रपुर, भुसावळ, पारस, परळी, सांघिक कार्यालय मुख्य, पोफळी जलविद्युत केंद्र, उरण वायु विद्युत केंद्र, पुणे व नाशिक जल मंडळाच्या संघांचा सहभाग आहे.

काल (दि. 25) व्हॉलीबॉल, कबड्डी व इतर मैदानी स्पर्धांचे उदघाटन महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलास चिरूटकर, राजेश मोराळे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, उमाकांत निखारे, अनिल मुसळे यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी एस.एस. खैरनार, आर.एस. साबे, सचिन सातारकर, राजेश काळे, वैशाली धोंगडे, स्वप्निल पाटील आदींसह खेळाडू, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शशांक चव्हाण, सुर्यकांत पवार, लिना पाटील, येवलेकर आदी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

*