नाशिकची प्रयोगशील आनंदनिकेतन शाळा पाहून शिक्षणमंत्रीही भारावले

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. २७ : नाशिकमधील प्रयोगशील मराठी शाळा अशी ओळख असलेल्या आनंदनिकेतन शाळेला भेट देऊन शिक्षणमंत्री विनोद तावडेही भारावले. त्यांनी याबाबत ट्विटरवरून या शाळेच्या प्रयोगशील आणि प्रागतिक शिक्षणपद्धतीचे कौतुकही केले आहे.

आज शिक्षण क्षेत्रात सृजनात्मक प्रयोग मराठी भाषेत होणे आवश्यक आहे . मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळांनी आनंदनिकेतन सारखे प्रयोग केले पाहिजे. शिक्षण हे ताण तणावापासून मुक्त व आनंदायी असावयाला हवे व हेच तत्व नाशिकची आनंदनिकेतन जोपासत आहे व उद्याचे आत्मविश्वास युक्त उत्तम नागरिक निर्माण करत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा. विनोदजी तावडे यांनी शनिवारी आनंद निकेतन शाळेत केले.

नाशिकला शिक्षणसंस्थांच्या बैठकीसाठी  तावडे साहेब आले होते . त्यांच्या या अल्पकालीन भेटीतही त्यांनी शाळेची  संकल्पना, उपक्रम, वाटचाल, वाटचालीतील अडचणी समजावून घेतल्या. आपण पुन्हा जास्त वेळ काढून शाळेला भेट द्यायला येऊ असेही ते म्हणाले.

बरोबर आलेल्या शासकीय शिक्षण अधिकाऱ्यांना शाळेला सहकार्य करण्याचे आवर्जून सांगितले. अविष्कार शिक्षण संस्थेचे विश्वस्थ अरुण ठाकूर ह्यांनी तावडे साहेबांचे स्वागत आणि सत्कार केला .संस्थेच्या संचालिका विनोदिनी काळगी ह्यांनी सूत्र संचालन केले .तसेच कार्यक्रमाचे समायोजन मुख्य अध्यापिका निवेदिता भालेराव आणि दीपा पळशीकर ह्यांनी केले. आभार प्रदर्शन शोभना भिडे ह्यांनी केले .संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग तसेच शिक्षण क्षेत्रातिल शासकीय अधिकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

*