Video : नाशिकच्या तरुणामुळे कुत्रा चाकांवर चालतो तेव्हा…अवश्य बघा व्हिडिओ

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. ५  – ही गोष्ट आहे नाशिककर तरुणाच्या असीम प्राणीप्रेमाची आणि त्याच्यातील मानवी सहृदयतेची…!!!

काही दिवसांपूर्वी मेरी परिसरात एका कुत्र्याच्या पिलाच्या मागच्या पायावरून वाहन गेले. तेथून जात असलेल्या मंगलरूप गोसेवा ट्रस्टमधील पुरुषोत्तम आव्हाड या तरुणाने त्या पिलाला उचलले आणि उपचारासाठी दवाखान्यात नेले.

तिथे पिलाचा एक्सरे केला. त्यात त्याचे मागील दोन्ही पायांची हाडे तुटल्याने ते कधीच चालू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यानच्या काळात पुरुषोत्त्मने मायेने त्या पिलाचा सांभाळ केलाच, पण त्याला पायावर उभे करण्याचा निश्चयही केला.

झाले.. त्यासाठी त्याने मग विविध कल्पना लढवून त्याला चाके बसविण्याचे ठरविले. त्यासाठी प्लॅस्टिकचे पाईप, लहानमुलांच्या सायकलची उपयोगात नसलेली चाके असे साहित्य जमवले.

शेवटी मोठ्या मेहनतीने एक पांगुळगाडा तयार झाला. त्याच्या मित्रांनीही त्याला मदत केली. आता प्रश्न होता तो कुत्र्याचे पिलू चालेल का याचा.

सर्वांनाच त्याची उत्सुकता होती. पण अखेर पुरुषोत्तमचे प्रेम आणि चिकाटी उपयोगाला आली. पांगुळगाडा बसवताच ते गोंडस पिलू चालायलाच नाही, तर पळायलाच लागले.

अलिकडे अपघातात माणूस माणसाच्या मदतीला येणे दुर्मीळ झाले, त्यात पुरुषोत्तमने प्राण्याच्या मदतीला जाणे आणि त्याच्यासाठी काही करणे हे नक्कीच इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

पुरुषोत्तमची ही गोष्ट तुम्हाला आवडली, तर नक्कीच शेअर करा. जर त्यासाठी वरती दिलेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्‌अप आयकॉवर क्लिक करून शेअर करता येईल

 

LEAVE A REPLY

*