संदीप जाधव खंडोबा यात्रेच्या कुस्तीचा मानकरी

0

दे. कॅम्प । दि. 25 वार्ताहर
उचल, टाक, बजरंगबली की जय असा जयघोष करत देवळालीच्या खंडोबा टेकडीवर रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत पिंपळगाव बसवंतच्या संदीप जाधव या पहिलवानाने साकूरच्या गोटीराम सहाणे याला तुल्यबळ लढतीत चितपट करत मानाचा फेटा पटकावला.

खंडोबा यात्रेत परंपरेनुसार दंगली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 3 वाजता सुरू झालेल्या कुस्त्या 6 वाजेपर्यंत सुरू होत्या. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, येवला, भगूर, पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव खांब, आडवण, वंजारवाडी, शिवडा, गणेशगाव, शिंदे आदि भागातील मल्लांसह राजस्थानस्थित असलेल्या लष्करी मल्लांनी हजेरी लावत ढाक, कलेजांग, बांगडी, घिस्सा आदि डावपेच दाखवले.

छोट्या गटातील कुस्त्या अतिशय प्रेक्षणीय ठरल्या. मोठ्या गटात राष्ट्रीय पातळीवर खेळणार्या मल्लांनी दाखविलेले डावपेच शौकीनांना आवडले. स्पर्धेतील अंतिम विजेत्याला सतीश मेवानी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून सचिन आमले, प्रविण पाळदे, प्रकाश आमले आदींनी काम बघितले.

यावेळी शिगवे बहुलाचे वस्ताद भाऊसाहेब मोजाड, सुर्यकांत मोजाड, उत्तम मांडे, उत्तम वावरे, सचिन गावंडे, विठ्ठल कांडेकर, सागर निसाळ, वैभव चोभे, योगेश साळवे, कैलास गायकर, नितीन कांडेकर, विकास पाळदे, निलेश साळवे, रवी घोरपडे आदींसह मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रकाश आमले, कमलाकर आमले, सतिश म्हस्के, नितिन आमले, प्रशांत म्हस्के, सचिन गायकवाड, सचिन झुटे आदि प्रयत्नशील होते.

LEAVE A REPLY

*