Video : पिंपळगाव बसवंतजवळ सुखोई विमान कोसळले; पायलट सुखरूप

0

नाशिक, ता. २७ : (प्रतिनिधी/वार्ताहर)

आज सकाळी साडे दहाच्या च्या सुमारास पिंपळगाव बसवंतजवळील शिरवाडे वणी जवळ एअर फोर्सचे सुखोई ३० क्रमांक २१० विमान ट्रेनिंगदरम्यान कोसळले असल्याची माहिती  उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी देशदूतला दिली.

विमानातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहे. वावी ठुशी शिवारातील सचिन सुखदेव निफाडे, योगेश ढोमसे, विलास निकम यांचे द्राक्षबागेवर विमान कोसळले.

आज सकाळी सरावासाठी हे विमान आकाशात झेपावले होते. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने ‘क्रॅश लँड’ केले. त्यानंतर विमानातील वैमानिकांनी विमानाबाहेर उडी टाकत पॅराशुटच्या साह्याने स्वत:चा बचाव केला.

विमान कोसळल्यानंतर परिसरात मोठा आवाज होऊन धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विमान कोसळताना अनेकांनी पाहिले. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन ‘काळजाचा’ ठोका चुकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

विमान शेतात पडल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नसली, तरी तेथील द्राक्षबागेचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

देशाच्या संरक्षणासाठी सुखोईचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. त्याचे उत्पादन एचएएल ओझरला होते. मात्र अशा लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने तंत्रज्ञांसमोर नवे आव्हान उभे राहिले असून लष्करी अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*