अभिमानास्पद; कुंभमेळ्याच्या मार्गदर्शनासाठी अलाहाबादचे पोलीस नाशिकमध्ये

0

 नाशिक । दि. 13 (प्रतिनिधी)

नाशिक येथे 2014 – 15 मध्ये अतिशय सुरक्षित पद्धतीने पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळाचा आदर्श समोर ठेवून अलाहाबाद येथे होत असलेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मार्गदर्शन घेण्याच्या हेतूने अलाहाबाद येथील पोलीस अधिकार्‍यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेत माहिती घेतली.

अलाहाबाद येथील होऊ घातलेल्या कुंभमेळ्याची तयारी तेथील शासनाने सुरू केली आहे. येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी कविंद्र प्रताप सिंह व पोलीस उपअधीक्षक प्रमोद शर्मा यांनी आज नाशिक पोलीस आयुक्तालयात आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी नाशिक कुंभमेळ्यात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलेल्या उपायोजना, साधू महतांना पुरवलेली सुरक्षा, पोलीस बंदोबस्त, मार्गांचे नियोजन व भाविकांची सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण, यासाठीच्या पद्धती, अंतर्गत पार्किंग, बाह्य पार्किंग, दिशादर्शक फलक, नो व्हेकल झोन, नो मॅन झोन, त्यांचे टप्पे, बॅरेकेडींग, निरिक्षण मनोरे, टेहळणी, सीसीटिव्ही मॉनेटरींग, ध्वनीक्षेप, वायरेलस यंत्रणेचा वापर, नियोजन, प्रकाश व्यवस्था, अ‍ॅम्बुलन्स, आरोग्य यंत्रणेच्या जागा, उपलब्धता, स्नानासाठी जाणारा शाही मार्ग, भाविकांचा मार्ग, स्नानाच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था, बंदोबस्त, परतीचे मार्ग, बुडणारांना वाचविण्यासाठीची यंत्रणा, हरवलेले शोधण्यासाठीची यंत्रणा, सर्व प्रकारची पथके, सुरक्षा यंत्रणांचा वापर, हजारो पोलिसांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था यासह विविध बांबींची माहिती त्यांनी घेतली.

संबंधित अधिकार्‍यांना नाशिक येथे करण्यात आलेल्या नियोजनाचा आराखडा, छायाचित्रे तसेच प्रत्यक्ष व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आले.

तसेच आुयक्त सिंगल यांनी यापुर्वीच्या कुंभमेळ्याच्या नियोजन अनुभवावर लिहलेले कुशावर्ताचा कोतवाल हे पुस्तक अधिकार्‍यांना भेट म्हणून देण्यात आले. यावेळी पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, माधुरी कांगणे कुंभमेळ्यात कार्यरत व मुख्य जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*