Type to search

Featured नाशिक

लासलगाव रस्त्यावर बसचालकास मारहाण; गुन्हा दाखल

Share
सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या, Latest News Women Suicide Shrirampur

लासलगाव | वार्ताहर

येथील पिंपळगाव लासलगाव रस्त्यावर बसचालकास मारहाण केल्याची घटना काल (दि २६) पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, येवल्याहून निघालेली बस क्रमांक ( एम एच १४ बीटी ०५५६) पाटोदामार्गे लासलगावला निघाली होती. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या संशयित राहुल सुरेश पोटे याने बसचा पाठलाग करून बसला त्याची दुचाकी आडवी घातली. त्यानंतर चालकासोबत हुज्जत घातली.

दरम्यान, पोटे याने चालक सूर्यभान रामभाऊ नागरे (वय 54) यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली तसेच मारहाणदेखील केली.  याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात संशयित पोटे विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लासलगाव पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!