Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘शिवशाही’बस प्रवासाला प्रवाशांची नापसंती! ; नाशिकचे भारमान ४८ टक्के

Share
‘शिवशाही’बस प्रवासाला प्रवाशांची नापसंती! ; नाशिकचे भारमान ४८ टक्के Travelers dislike 'Shivshahi' bus journey!

नाशिक | प्रतिनिधी

कधी बंद तर कधी चालू होणारे एसी, बसचे बिघडलेले वेळापत्रक, अस्वच्छता आणि अपघातांची वाढती संख्या या कारणांमुळे एसटी महामंडळाच्या शिवशाही वातानुकूलित बस प्रवासाला प्रवाशांनी नापसंती दर्शविली आहे.

नाशिकसह औरंगाबाद, नागपूर, अमरावती प्रदेशात शिवशाहीचे भारमान ५० टक्क्यांपेक्षा खाली आले आहे. भाडेतत्त्वावरील अथवा स्वमालकीच्या शिवशाही बस चालवण्याचा सरासरी खर्च ४२ रुपये प्रति किलोमीटर आहे. परंतु आठ महिन्यांत प्रति किलोमीटर ३ रुपये तोटा सहन करूनही या बस चालवण्याचा अट्टहास एसटी महामंडळाकडून केला जात आहे.

आठ महिन्यांत ३९ रुपये प्रति किलोमीटर दराने सुमारे ३६१ कोटी रुपयांचा महसूल शिवशाहीकडून महामंडळाला प्राप्त झाला आहे. तोटा झाल्याने यंदा ४० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा महसूल महामंडळ प्राप्त करण्यात अपयशीच ठरले आहे.

शिवशाहीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून प्रति किलोमीटर ३ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये शिवशाही वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांचे गालबोट लागले. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ मध्ये शिवशाहीचे २२१ अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या २४० एवढी होती.

अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही. त्यातच प्रवाशांना न घेताच निघून जाणे, वेळेत बस उपलब्ध न होणे, एसी यंत्रणेसह गाडीत बिघाडासह बसची अस्वच्छता इत्यादी कारणांमुळे प्रवाशांकडून तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. १ एप्रिल ते १५ डिसेंबर २०१९ अखेर एसटी महामंडळाचे भारमान गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी घटले. याचे प्रमुख कारण हे शिवशाही सेवेला प्रवाशांकडून मिळालेला अल्प प्रतिसाद. शिवशाही सुरू होताच त्याचे प्रवासी भारमान ५४ टक्के होते. ते या वर्षांत घसरून सरासरी ५१ टक्क्यांवर आहे.

शिवशाहीचे प्रदेशनिहाय भारमान
औरंगाबाद प्रदेश ः ४९ टक्के, मुंबई प्रदेश ः ५८ टक्के, नागपूर प्रदेश ः ४२ टक्के, पुणे प्रदेश ः ५६ टक्के, नाशिक प्रदेश ः ४९ टक्के, अमरावती प्रदेश ः ४५ टक्के

सेवा प्रकार प्रवासी भारमान (टक्क्यांत)
हिरकणी बस ६६
शिवशाही बस ५१
शिवनेरी बस ५०

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!