Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावात पुन्हा कोरोनाचा कहर; नवे १३ रुग्ण बाधित आढळले

मालेगावात पुन्हा कोरोनाचा कहर; नवे १३ रुग्ण बाधित आढळले

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकच्या मालेगावमध्ये आणखी 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या 12 तासात एकूण 18 रुग्ण कोरोनाबाधित सिद्ध झाले आहेत. मध्यरात्री 5 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर पुन्हा 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मालेगावात प्रचंड कहर कोरोनाने केलेला दिसून येत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व रुग्ण हे मागील कोरोना बाधित रुग्णांचे निकटवर्तीय असल्याचे समजते आहे.

- Advertisement -

आजच्या मालेगावच्या धक्क्यानंतर जिल्ह्यात एकूण ३१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नाशिक शहरातील तीन, चांदवडमधील १, पिंपळगाव नजीक येथील १, व मालेगावमधील २७ रुग्णांचा समावेश आहे.

मालेगावमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर पिंपळगाव नजीकच्या एका रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे.  तसेच मालेगावमधील इतर  तीन कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

रात्री मालेगावमध्ये जे सात रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये एक ७ वर्षांची   मुलगी आहे, एक १० वर्षांचा मुलगा, ३८ वर्षांची महिला, एक १७ मुलगा तर ४०   वर्ष वयोगटाची पुरुष असल्याचे समजते आहे.

नाशिक जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या संशयितांना खासगी रुग्णलायत शिफ्ट करणार असल्याचे समजते. या आधी ज्या रुग्णांना कोरोना झाला त्यांच्या निकटवर्तीयांचा नवीन रुग्णालयात समावेश करण्यात येणार असल्याची प्रशासनाची तयारी आहे.  मालेगावात कोरोनाची लागण झपाट्यानं होत असल्याने आरोग्य विभागाची अतिरिक्त टीम नेमण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या