Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रस्त्यांची चाळण, बस फेऱ्या बंद; पेठ तालुक्यातील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

Share
कोहोर | वार्ताहर 
पेठ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागातल्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेच्या वतीने तालुक्यातील आगार प्रमुख व उपअभियंता बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर बस सुरु करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
पेठ तालुक्यात झालेल्या कोसळधार पावसाने अनेक छोट्या-मोठ्या पुल फरशीवरून पूराचे पाणी वाहून गेले होते. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली. पावसाळ्यात अतिरुंद रस्त्यांवर दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे याठिकाणच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या.
पाऊस ओसरला असून बांधकाम विभागाकडून लवकरात रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. जेणेकरून बस सुरु होईल परिणामी येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे होत असलेले अतोनात हाल कमी होतील.
तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सहामाई व इतर चाचणीपरिक्षा जवळ येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना बसअभावी शाळा बुडवावी लागते आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर बस सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, अभाविप संघटनेच्यावतीने तत्काळ तालुका उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व  पेठ आगारप्रमुख यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये पेठ ते भूवन-हनुमंतपाडा-आडगाव (भू.), पेठ ते बाडगी-देरापाडा आणि  पेठ ते आंबे- डिक्सळ-मनखेड, रस्त्याची दुरुस्ती करुन तत्काळ बसेस चालु करण्यात यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!