कसारा घाटात सकाळी दीड तास वाहतुक ठप्प

0

इगतपुरी । दि. १४ (प्रतिनिधी)

मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या मुंबई आग्रा  महामार्गावरील कसारा घाटात सकाळी वाजेच्या सुमारास एक महाकाय ट्रेलर रस्त्यातच मोठ्या वळणावर मध्य भागी बंद पडल्यामुळे नाशिकला येणारी वाहतुक सुमारे दीडतास ठप्प झाली होती.

यामुळे सुमारे दीड ते दोन किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या घटनेची माहीती समजताच आपत्ती व्यवस्थापन गृपचे सदस्य व घोटी टोल प्लाझा वरील पिक इनफ्राचे रूट मैनेजर जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ऊमेर शेख, रवि देहाडे, प्रथमेश पुरोहित, शिवा कातोरे, राजु मोरे, सचिन भडांगे, वसिम शेख, दिपक उघाडे, रवि दुर्गुडे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केले.

प्रथम बंद पडलेला कंटनेर क्रेनच्या सहायाने रस्त्याच्या बाजूला करून वाहतुक कोंडी सोडवत वाहतुक सुरळीत केल्याने वाहन चालकांनी सुटकेचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

*