Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : क-ही येथील लष्करी जवानाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

Share

मनमाड | वार्ताहर

मनमाडपासून जवळ असलेल्या क-ही येथील मल्हारी खंडेराव लहरे या लष्करी जवानाचा कर्तव्य बजावत असतांना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. मल्हारी यांचे निधन झाल्याचे वृत्त येताच क-ही गावासह मनमाड आणि संपूर्ण नांदगांव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, मनमाड पासून सुमारे 7 किमी अंतरावर असलेल्या क-ही या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात मल्हारी खंडेराव लहरे याचा जन्म झाला.

ते डिसेंबर 2012 साली लष्करात भरती झाला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य त्यांनी बजावले. सध्या त्यांची नियुक्ती गुजरात राज्यातील जामनगर येथील एडीआरटीच्या युनिटमध्ये झाली होती.

ते शस्त्रगाराच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर होते. येथील एका उंच जागेवर कर्तव्य बजावत असताना काल दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या चार वर्षापूर्वी मल्हारी यांचे लग्न झाले होते. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून त्याने सुट्टी मागितली होती मात्र ती न मिळाल्याने अखेर त्याने पत्नी व मुलाला जामनगरला बोलवून घेतले होते.

पत्नी आणि मुलगा आल्यावर रविवारी सर्वजण फॅमिली क्वार्टला शिफ्ट झाले होते. लग्नानंतर पत्नी आणि मुलांसोबत पहिल्यांदाच युनिटमध्ये क्वार्टर भेटलं होते.

कुटुंबासोबतच्या फक्त 5 व्या दिवशी कर्तव्यावर असताना वीज पडून मल्हारी लहरे यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र सोक व्यक्त केला जात आहे. मल्हारीचा मृत्यू झाल्याचे समजताच क-ही गावासह, मनमाड आणि संपुर्ण नांदगांव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव आज रात्री 11 वाजता मूळगावी क-ही येथे दाखल होणार असल्याचे समजते आहे. उद्या सकाळी 10 वाजता शासकीय इतिमामात  अंत्यासंस्कार केले जाणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!