Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आदिवासी कणसरा माता महोत्सवाचा रावण ताटी नाचवून जल्लोषात समारोप

Share
नाशिक | प्रतिनिधी
म्हसरूळ येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रावणाची ताटी नाचवून येथील कन्सरा मातेच्या यात्रोत्सावाची सांगता करण्यात आली. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, सामाजिक, वैचारिक प्रबोधन व्हावे व या उत्सवाच्या माध्यमातून शहरी भागात राहणारे सर्व आदिवासी बांधव संघटीत व्हावेत त्यांच्यात एकात्मतेची भावना रुजावी यासाठी या कार्याकारामाचे आयोजन दरवर्षी केले जाते.
या महोत्सवामध्ये पहिल्या माळेपासून ते विजयादशमी पर्यंत भरगच्च अशा आदिवासी संस्कृतीवर प्रकाश टाकणारे पारंपरिक गायन, नृत्य, वादन,वेशभूषा अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात खास आकर्षण ठरले ते ढाक वादन व आदिवासी गाणे,पावरी व तारपा नृत्य (उंबरठाण कला पथक), थाळ गाण तथा घांगळ भक्ती(वांगण कला पथक),माधळ नृत्य(भुवन सुरगाणा कला पथक), तूर नृत्य बिरसा मुंडा कला पथक (डोल्हारे),कांबड नृत्य व ठाकर नृत्य(पायरपाडा कला पथक),सोंगे नाचवणे बोहाडा(हातरुंडी, आमदा,पायरपाडा कला पथक) या सर्व संस्कृतीतीवर्धक  कार्यक्रमांचे या महोत्सवात सुंदर,व पारंपरिक पद्धतीने सादरीकरण  करण्यात आले.
आदिवासी वेशभूषा करून स्पर्धा घेण्यात आल्या.विजयादशमीच्या दिवशी सकाळी १० वाजता कणसरा चौक ते बोरगड- म्हसरुळ परिसरातून याहा मोगी कणसरा मातेच्या मूर्तीची मिरवणूक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या लंकापती रावणाची ताटी तसेच विविध सोंगांचे मुखवटे नाचवुन वाजत गाजत पुजारा साबळे यांच्या निवास स्थानी नेऊन मूळ ठिकाणी स्थापित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यात आदिवासी बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष अशोक बागुल तसेच किसन ठाकरे, रावण चौरे, जयवंत गारे, डॉ. जगदीश चौरे, राकेश दळवी, विलास राठोड, विजय पवार, मयुर बागुल, रुख्मिणी गवळी, सरोज भोये, उषा बागुल, सुरेखा ठाकरे, भारती भोये, सरला ठाकरे, तेजश्री चौरे, शिवाजी ठाकरे, कवी रमेश भोये आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!