Video : लहान आणि मध्यम उद्योग येणार ‘जेट एअरवेज ग्लोबल लिंकर’द्वारे एकत्र

विविध उपक्रम आणि सवलतीतून होणार उद्योजकता विकास

0

नाशिक | मध्यम आणि लहान उद्योजकांची संख्या भारतात अधिक आहे. अतिशय कमी खर्चात हळहळू कोट्यावधीचे उड्डाण करणाऱ्या या उद्योजकांना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. संपर्काचे माध्यम मर्यादित असल्यामुळे त्यांचा पाहिजे तसा विकास होताना दिसत नाही.

त्यामुळे जेट एअरवेज आणि ग्लोबल लिंकर यांनी जेट एअरवेज ग्लोबल लिंकर नावाची वेबसाईट सुरु केली आहे. याद्वारे प्रवासी विनाशुल्क नोंदणी करू शकतात. तसेच जेटकडून प्रवाशांसाठी राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

स्टार्ट अपच्या माध्यमातून लहान आणि मध्यम उद्योजक ज्यांच्याकडे कर्मचारी संख्या ३० ते ३०० पर्यंत आहे. असे उद्योजक ग्लोबल लिंकरवर मोफत खाते उघडू शकतात. यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान उद्योजकांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्लोबल लिंकच्या माध्यमातून कामाची पद्धती एक असणाऱ्या उद्योगनिर्मितीला चालणा मिळणार आहे. यातून कामाची व्याप्ती वाढेल परिणामी उद्योग विकासात भर पडणार आहे.

उद्योजकांसाठी ईबीज कार्ड, डिजिटल बिजनेस प्रोफाईल तसेच डिजिटल कॅटलॉग बनवता येणार आहेत. तसेच जास्तीत जास्त उद्योग कम्युनिटीची जोडले जाऊन दीड लाखापेक्षा अधिक कंपन्यांना यात सहभागी करून घेता येऊ शकते.

लहान उद्योजकांना जर बाहेरील देशात जाऊन उद्योगवृद्धी करावयाची असेल तर त्यांना जेटकडून १० टक्के विमानप्रवास सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त हॉटेल बुकिंग, व्यापार विमा, प्रकाशन, कायदेशीर सेवा आणि अनुपालन यासारख्या सुविधा मिळणार आहेत.

लहान उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन मोफत ई-कॉमर्स स्टोर, मोफत सल्ला मसलत केंद्र, विविध लेख याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. थोडक्यात, जास्तीत जास्त उद्योजकांना उद्योगवाढीसाठी वाव याठिकाणी मिळणार आहे.

ग्लोबल लिंकरच्या माध्यमातून नेट्वर्किंग फीचर्स, बीज फीचर्स, बीज ऑफर्स, लिंकर स्टोअर, बिजनेस इफ़िसिएन्सि टूल( यात कॅलेंडर, ई-ब्रीफकेस आणि ई-मेल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत) अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विविध सोयीसुविधा लहान आणि मध्यम उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नाशिकच्या लघु आणि मध्यम उद्योगांना मिळणार चालना

नाशिकमध्ये अनेक लहानमोठ्या खूप कमी काळात स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आज कंपन्यांच्या विविध शाखा उघडणे सुरु आहे. देशविदेशातील अनेक कंपन्या या कंपन्यांना काम देत आहेत. अग्रो क्षेत्रातही आज मोठी प्रगती नाशिककरांनी केली आहे. त्यामुळे जेटएअरवेजच्या ग्लोबललिंकरच्या माध्यमातून या उद्योगांना चालना मिळणार आहे.

ही आहेत ठळक वैशिष्ट्ये

  • ग्रुप : अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या उद्योजकांना एकत्रित आणत कामाचे स्वरूप, ठिकाण आदींची माहिती उपलब्ध करून देतात.
  • उपक्रम : समविचारी उद्योजकांना एकत्रित आणत त्यांच्या माध्यमातून व्यापारवृद्धीस मदत करणे.
  • साधने :  विविध प्रेरणादाई लेखांची एक शृंखला आहे. विविध घटना, व्हिडीओज तसेच ग्लोबल लिंकरच्या संपादकीय टीमच्या माध्यमातून उद्योजक विकास कार्यशाळा.
  • एसएमई प्रेरणा : लहान आणि मध्यम उद्योजकांच्या यशोगाथेवर आधारित एक शृंखला सुरु आहे. या घटना जेट एअरवेजने फ्लाईट पत्रिका, जेट विंग्सच्या मासिकांमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. याचा  उपयोग लहान आणि मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी होईल.
  • ऑफर्स आणि उपक्रम : ग्लोबल लिंकरवर नोंदणी केलेल्या सदस्यांना नियमित वेगवेगळ्या ऑफर्स आणि उपक्रमांसंदर्भात माहिती वेळोवेळी दिली जाते.

 

LEAVE A REPLY

*