Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : इंडियन ऑईल कंपनी अधिकाऱ्याची मुजोरी; टँकर चालकांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ

Share

मनमाड | वार्ताहर

अधिकारी नेहमीच मनमानी करून त्रास देतात असा आरोप करत आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या टँकर चालकांना इंडियन ऑयल कंपनीच्या नागापूर प्रकल्पातील एका अधिकाऱ्याने दमदाटी देत थेट अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना आज प्रकल्पाच्या मुख्य गेट समोर घडली.

विशेष म्हणजे या शिवीगाळचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो पाहून अन्य टँकर चालकांसोबत वाहतूकदारामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी चालक व इंधन वाहतूकदार संघटनेने केली आहे. अन्यथा काम बंद आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.

मनमाड पासून 4 किमी अंतरावर नागापूर परिसरात इंडियन ऑयल कंपनीचे इंधन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून रोज शेकडो टँकरच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डीझेलचा पुरवठा केला जातो.

प्रकल्पातील अधिकारी नेहमीच मनमानी करून त्रास देतात असा आरोप करत आज सकाळी टँकर चालक आंदोलन करण्याची तयारी करत असल्याची माहिती प्रकल्पातील अधिकारी लिंगायत यांना मिळाली  होती.

त्यानंतर संतप्त झालेले लिंगायत  थेट मुख्य गेटवर धाव घेवून तेथे टँकर चालकांना दमदाटी केली. इथेच लिंगायत न थांबता अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ लिंगायत यांनी टँकर चालकांना केली.

हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडीओत लिंगायत या अधिकाऱ्याची मुजोरी पाहून इतर टँकर चालकांसोबत इंधन वाहतूकदारामध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे.

टँकर चालकांनी या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.  दरम्यान, इंधन वाहतूकदार संघटनेचे नाना पाटील, सचिन गवळी, संजय पांडे, भाऊसाहेब पवार, अशोक सानप, नाथा उगले, कमलेश सांगळे यांच्यासह इतरांनी प्रकल्पातील अधिकऱ्यांची भेट घेवून चर्चा केली.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्या सोबत संपर्क करण्यात आला असता सोमवारी या बाबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती नाना पाटील यांनी दिली या बैठकीत सन्मानजनक तोडगा नाही निघाला तर मंगळवारपासून संप करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!