Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘स्मार्ट पार्किंग’चे जुलैमध्ये उद्घाटन

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरात वाढणारी वाहनांची संख्या त्यासोबतच उद्भवणारा वाहनांच्या पाकिर्ंंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंंभीर होऊ लागलेला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्मार्ट पार्किंगसाठी शहर परिसरातील 15 जागांचे उद्घाटन 1 जुलै रोजी करण्यात येेणार आहे.
नाशिक शहर परिसरात वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागलेली आहे.

वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या टोईग मोहीमेने नागरिकही हैराण झालेले आहेत. वाहने कोठे लावावीत याबद्दल मार्गदर्शक जागा निश्चित करण्याची मागणी नागरिक करताना दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून ट्रॅफिक समस्येचे निराकरण करण्यासाठी स्मार्ट पार्किंग स्थापित करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या.

या सुविधेंतर्गत कार पार्क केल्या जाणार्‍या ठिकाणी एक सेन्सर लावले जाणार आहे. तसेच या सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यामाध्यमातून कोणती कार पार्क केली गेली, पार्किंगवर किती वेळ उभे होती याची माहिती सेन्सरच्या माध्यमातून संंकलित केली जाणार आहे. या वाहनाची संपूर्ण माहिती नियंत्रण कक्षामध्ये देखील उपलब्ध राहणार आहे.

शहरात पार्किंगची समस्या येते. म्हणून, लोक पार्किंगसाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध घेत असतात. शहरात, दुचाकी आणि चार-चाकी गाड्यांची संख्या देखील वाढली आहेत. सरकारी कार्यालये आणि बाजारपेठेत वाहनांसाठी कोणतीही अधिकृत पार्किंग नसते.परिणामी बहुतांश नागरिकांना त्यांच्या वाहनांसह बाहेरच उभे राहावे लागते.

स्मार्ट सिटीने स्मार्ट सिटी पार्किंग सांठी 30 ठिकाणांची निवड केली आहे. यापैकी 6 ठिकाणी ऑफ-स्ट्रीट पार्किंग आहे. येत्या 1 जुलै रोजी 13 मुख्य रस्त्यावरील स्थान आणि 2 ऑफ स्ट्रीट असे 15 स्थानाचे उद्घाटन केले जाणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!