Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

स्मार्ट सिटीअंतर्गत आजपासून सीबीएस सिग्नल चौक होणार चकाचक

Share

नाशिक । प्रतिनिधी

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून त्याअंतर्गतच सीबीएस सिग्नल चौकाच्या कामालाही आज (दि.26) प्रारंभ होणार आहे.

त्यापार्श्वभूमीवर या चौकातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेने त्यासंबंधी अधिसूचनाही जारी केली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे तर त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या रस्त्याचे काम सुरू आहे. यादरम्यान मेहेर सिग्नल व सीबीएस सिग्नल या दोन चौकाचे काम मात्र रेंगाळलेले आहे.

त्यामुळे आता या मार्गावरील सीबीएस चौकाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सीबीएस चौक (दि.26) वाहतूकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे शालिमारकडून सीबीएस मार्गे टिळकवाडीकडे येणार्‍या वाहनांना तर, टिळकवाडी सिग्नलकडून शालिमारकडे येणार्‍या वाहनांना या सीबीएस चौकातून प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

त्यासाठी शालिमारकडून सीबीएसकडे येणार्‍या वाहनांनी शालिमार, खडकाळी सिग्नल, जिल्हा परिषद, मोडक सिग्नलमार्गे मार्गस्थ होतील. तर टिळकवाडूकडून येणार्‍या वाहनांनी जलतरण, मोडक सिग्नल मार्गे वा टिळकवाडी सिग्नल, राणे डेअरी, मॅरेथॉन चौकातून मार्गस्थ होतील.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी वाहतूक मार्गातील बदलासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार (दि.26) सीबीएस चौक वाहतूकीसाठी बंद होणार आहे. रस्त्याचे काम पूर्णत्वास जाईपर्यंत सदरचे आदेश लागू असतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!