Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मासे वाहतुकीच्या नावाखाली अवैध मद्य वाहतूक; वाघेरा परिसरात ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Share

नाशिक | प्रतिनिधी 

भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा घाट परिसरातून संशयित वाहनातून तीन लाखांच्या मद्यासह एकीन ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर पिकअप चालकासदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सीमावर्ती भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा घाट परिसरातून मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार संशयित वाहन ताब्यात घेऊन सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ३ लाख रुपयांचे मद्य तर एक पिकअप वाहनाचा समावेश आहे.

अधिक माहिती अशी की, माशांची वाहतूक करत असल्याचा बनाव रचत संशयित वाहनात चोर कप्पा तयार करण्यात आला होता. यामध्ये अवैध मद्य ठेवले होते. तासभर वाहनाची चौकशी केली असता चोरकप्प्यातून महागड्या मद्याच्या बाटल्या मिळून आल्या.यावेळी भरारी पथकदेखील गंभीर प्रकार बघून आवाक झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मुद्देमाल कुठून आणला जात होता? तसेच कुठे मुद्देमालाची विक्री केली जाणार होती याबाबत माहिती समोर येणार आहे. संशयित पीक अप चालकास ताब्यात घेण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार मोठी साखळी या घटनेच्या सखोल चौकशीअंती समोर येण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!