Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून अवैध मद्याची वाहतूक; राज्य उत्पादनकडून पर्दाफाश

Share

नाशिक | प्रतिनिधी

चाळीसगाव आगाराची नाशिकमार्गे सिल्वासा ते चाळीसगाव या बस मधून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा घालून अवैध मध्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक हे संगनमत करून अवैधरित्या विदेशी बनावटीचे दादरा नगर हवेलीतून महाराष्ट्रात आणत असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना आला होता.

दरम्यान, चाळीसगाव आगाराची बस सिल्व्हासाहून नाशिकमार्गे चाळीसगावला जात होती. ही नस नाशिक येथील नवीन मध्यवर्ती बस स्थानकात आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा घातला. यावेळी बसची तपासणी केल्यानंतर एका आसनाच्या खाली दहा मद्याच्या बाटल्या एका बॉक्समध्ये आढळून आल्या.

त्यानंतर या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून चालक व वाहकावर काय कारवाई करण्यात आली याबाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!