निराधार महिलांचे प्रश्न ऐकून कॉंग्रेस आमदार ढसाढसा रडल्या

0
घोटी | जाकीर शेख 
पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलेचे जीवन फार वाईट असते. सासरच्या लोकांकडून क्षणोक्षणी मिळणारी अपमानास्पद वागणूक, चिमुकल्यांचे संगोपन, पोटाला चिमटा घेऊन केलेले मुलांचे शिक्षण, सासरच्या लोकांकडून डावललेला जमिनींचा हक्क अशा अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या निराधार महिला आज इगतपुरीत अर्थसहाय्य घेण्यासाठी आल्या होत्या.
इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या आमदार निर्मला गावित ह्यादेखील योगायोगाने इगतपुरीत उपस्थित होत्या. त्यांना निराधार महिला आल्याची माहिती समजताच त्यांनी सर्व सोपस्कार बाजूला ठेवून सर्व महिलांची आस्थेने विचारपूस केली.
महिलांचे दुःख, समस्या, अडचणी समजून घेतल्या. हे सोडवण्यासाठी तातडीने आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संपर्क साधून सूचना दिल्या. महिलांना आपला मोबाईल नंबर देऊन २४ तास तुमच्या मदतीसाठी कधीही मोठी बहीण म्हणून मला बोलवा असे सांगितले.
याबाबत कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले की, ह्या महिलांच्या प्रश्नावर आपण काय केले हे मला वेळोवेळी कळवा.
निराधार महिलांच्या समस्या ऐकून घेत आमदार गावितांना अक्षरशः रडू कोसळले. हा प्रसंग इतका दु:खद होता की, आजूबाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनीदेखील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

LEAVE A REPLY

*