LOADING

Type to search

आधारकार्ड नंबर देऊन अवघ्या चार तासांत मिळवा ‘पॅनकार्ड’

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सेल्फी

आधारकार्ड नंबर देऊन अवघ्या चार तासांत मिळवा ‘पॅनकार्ड’

Share

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक | पॅनकार्डला भारत सरकारचा अधिकृत परवाना मानले जाते. अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकेतील आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

पूर्वी पॅनकार्डसाठी खूप काळ वाट पाहावी लागत असे. आता पॅनकार्ड मिळविण्याची प्रक्रिया अगदी सहज आणि झटपट झाली आहे. अवघ्या चार तासांत तुम्हाला तुमचे पॅनकार्ड मिळू शकणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT)चे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभाग 4 तासांत पॅनकार्ड इश्यू करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

आजपासून (दि. 5) पॅनकार्डमध्ये सीबीडीटी (CBDT) यासाठी नव्या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे 4 तासात पॅनकार्ड तयार करणे शक्य होईल. यावर्षी किंवा काही काळानंतर ही सेवा सुरु करण्यात येईल. यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त आधार कार्डचे डिटेल्स द्यावे लागतील.

एप्रिल 2017 मध्ये सीबीडीटीने ई-पॅन कार्डची सेवा सुरु केली होती. या सेवेअंतर्गत प्रत्येक आवेदकाला ई-पॅनची सॉफ्ट कॉपी पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवली जात होती. ती कॉपी डाऊनलोड करुन तुम्ही त्याचा उपयोग करु शकत होतात.
PAN म्हणजे परमनेंट अकाऊंट नंबर. यामध्ये 10 कॅरेक्टर्सचा अल्कान्युमरिक नंबर होता. यावरुन इनकम टॅक्स भरणाऱ्यांची माहिती टॅक्स डिपार्टमेंटला मिळते. याच्या आधारावरुन सरकारला नागरिकांचे आर्थिक व्यवहार समजतात. मोठे आर्थिक व्यवहार आणि इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासारख्या महत्त्वपूर्ण कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!