Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही – ना. देसाई

Share

नाशिक । प्रतिनिधी

शिवसेनेने अगोदरच जाहीर केलेले आहे. त्याप्रमाणे शिवसैनिक येत्या 16 तारखेला शिवसैनिक आयोध्येत राम मंदिराच्या ठिकाणी जाणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवसैनिक राम मंदीराच्या निर्माणाचा ध्यास घेत आयोध्येला जाणार आहेत. उद्देश एकच आहे. भारतातील सर्व हिंदूची तिव्र इच्छा आहे. आयोध्येत राम मंदिर उभे रहावे, ही मागणी थंड होऊ नये या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

निश्चित उद्देश सफळ होईल.उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच सर्व हिंदूच्या मनातील हे स्वप्न लवकर पूर्ण होईल असा विश्वास आहे.

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण उपमुख्यमंत्री पदाचे इच्छुक नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तो चर्चेचा विषयही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री मंडळाच्या विस्तारावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनापूर्वीच विस्तार होईल असे सूतोवाच केले आहे.

याबाबत त्यापूर्वी म्हणजेच येत्या दोन दिवसांत निश्चित निर्णय होईल. अग्निशमन केंद्राबद्दल बोलताना उद्योग क्षेत्रात आग लागू नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे.या विषयात उद्योगांनीही पूढाकार घेत काळजी घेणे गरजेचे असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!