Type to search

गृहविज्ञान : मुलींसाठी एक उत्तम पर्याय; जाणून घ्या अभ्यासक्रम

Breaking News Featured Special आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सेल्फी

गृहविज्ञान : मुलींसाठी एक उत्तम पर्याय; जाणून घ्या अभ्यासक्रम

Share

गृह म्हटले की घराशी संबंधित अभ्यासक्रम असा विद्यार्थिनींचा व पालकांचा समज होतो. तसेच हा विषय पाककलेशी, घराशी संबंधित असल्याचा समज झालेला आहे.गृहविज्ञान (होमसायन्स) ही शाखा म्हणजे केवळ पाककला शिकविणारा अभ्यासक्रम नाही. या शाखेअंतर्गत चालणारे विविध अभ्याक्रम हे अतिशय व्यापक आणि रोजगार व स्वयंरोजगार उभारण्यासाठी मोठे फायदेशीर आहेत.होमसायन्स पदवी अभ्यासक्रमात अनेक नवीन व उपयोगी घटकांचा समावेश आहे.होमसायन्स हा मुलींसाठी एक उत्तम पर्याय आहे.होमसायन्समुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शिक्षणाची संधी निर्माण झाली आहे.

होमसायन्सच्या प्रमुख शाखा : बालसंगोपन व कौटुंबिक आप्तसंबंध, पाकशास्त्र व आहारविद्या, वस्त्रप्रावरणे, शिवणकाम, विणकाम इत्यादी, गृहव्यवस्थापन, ग्रामीण व नागरी भागांतील गृहजीवनाचा अभ्यास व विस्तार.

संस्था : एसएनडीटी विमेन्स युनिव्हर्सिटी, श्री. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स (ऑटोनॉमस) हे एक स्वायत्त कॉलेज आहे.हे कॉलेज विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमध्ये आहे.

अभ्यासक्रम : येथे होम सायन्स शाखेतील दहा स्पेशलायझेशन्स उपलब्ध आहेत.बीएसई इन होम सायन्स पदवीबीएसई इन होम सायन्स मध्ये खालील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते: अर्ली चाइल्डहूड केअर आणि एजुकेशनटेक्स्टाइल आणि अ‍ॅपरल डिझायनिंगडेव्हलपमेंटल कौन्सिलिंगफूड आणि न्युट्रिशन, इंटिरिअर डिझायनिंगमास कम्युनिकेशन आणि मीडियाहॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटफोटोग्राफी आणि ऑडिओ प्रॉडक्शन

कालावधी :तीन वर्षे

पात्रता : आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यापैकी कोणत्याही एका शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी होम सायन्सच्या या अभ्यासक्रमांसाठी पात्र आहेत.सूचना: ’फूड आणि न्युट्रिशन’ या स्पेशलायझेशनसाठी केवळ सायन्स शाखेतील विद्यार्थिनीच प्रवेश घेऊ शकतात.एसव्हीटी कॉलेजचे होम सायन्स मधील इतर अभ्यासक्रम3 वर्षांचा पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा कोर्सेसदोन डिप्लोमा कोर्सेस आणितीन सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेतराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय जागारवींद्रनाथ टागोर मार्ग, नागपूर 440001 संकेतस्थळ :http://www.nagpuruniversity.org

अभ्यासक्रम : बीएसई इन होम सायन्स

कालावधी : 3 वर्ष

पात्रता : 12 वी उत्तीर्ण

विद्यापीठाच्या होमसायन्स विभागात फुड सायन्स अँन्ड न्युट्रिशन आणि रिसोर्स मॅनेजमेंट इत्यादी विषयांचे दोन वर्ष कालावधीचे पदव्युत्तर वर्ग यशस्वीरीत्या घेतले जातात. याचबरोबर गृहविज्ञान शाखेंतर्गत सर्व विषयांचे एम.फिल व पी.एच.डी. ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

पदव्युत्तर गृहविज्ञान विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, येथे अँडव्हांन्स्ड न्युट्रीशन, न्युट्रीशनल बायोकेमेस्ट्री, अँडव्हांस्ड फुड सायन्य व अर्गोनँमिक्स या विषयांच्या सुसज्ज प्रयोगशाळा आहेत.

संधी : होमसायन्स मध्ये फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डेकोरेशन, न्यूट्रिशन, डायजेशन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटसारख्या विषयांचा समावेश आहे. या विषयांत पदव्युत्तरस्तरावर स्पेशलायझेशन करणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये लहान मुलांचे मानसशास्त्र आणि मानवी विकासाचे विषय शिकवले जातात.

त्यामुळे प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकाच्या नोकरीची संधीही मिळते.प्ले-स्कूल, वृद्धाश्रम, कौन्सिलिंग सेंटरमध्ये समुपदेशक म्हणून काम करण्याची संधीबीएएसी होमसायन्स मध्ये विविध पदार्थ तयार करून ते शिकण्याचा स्वयंरोजगार करण्याची संधी आहेबीएस्सी. होमसायन्स झालेल्या विद्यार्थ्याला स्वतःचे बुटिक सुरू करता येते.

लेखक :प्रा योगेश हांडगे(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!