Type to search

Breaking News Featured गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

Video : घरगुती गणेशोत्सव : मैदानी खेळ, पोषक आहार आणि पर्यावरणपूरक सजावट

Share

नाशिकरोड | श्वेता खोडे 

गेल्या सात दिवसांपासून प्रत्येक घरात गणेशोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण आहे. यंदाच्या गणेशोत्सवात अनेक ठिकाणी जनजागृतीपर देखाव्यांची संख्या वाढलेली दिसून येते. जनजागृतीची ही मालिका केवळ मंडळ किंवा गावांपुरताच मर्यादित नसून ती आता घराघरातदेखील पोहोचलेली आहे.

नाशिकरोड परिसरातील जिजामाता नगर येथे वास्तव्यास असलेल्या माधुरी देशपांडे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. दरवर्षी वेगवेगळे संदेश घेऊन घरगुती गणेशोत्सवात विशिष्ट प्रकारची सजावट त्यांच्याकडून करण्यात येते. गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या सासऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अनोखी सजावट साकारली होती.

पेशाने सरकारी अधिकारी असल्या तरी त्या वेळेत वेळ काढून दरवर्षी अनोख्या देखाव्याची सजावट स्वतः करतात. विशेष म्हणजे यात पर्यावरणाला हानी पोहोचेल असे कुठलेही साहित्य वापरलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीही त्यांनी आकर्षक सजावट केली असून युवा पिढीला केंद्रस्थानी ठेवत त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव कशाप्रकारे देता येईल यावर प्रकशझोत त्यांनी टाकला आहे.

यात मैदानी खेळांचे महत्त्व, मोबाईल गेम्सचा वाढलेला वापर, अभ्यासाकडे झालेले दुर्लक्ष, आजच्या तरुण पिढीची वाटचाल, तरुण पिढीतील वाढत चाललेला मानसिक आणि शारीरिक ताण या सर्व गोष्टी समोर ठेवून अनोखा संदेश त्यांनी दिला आहे.

आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. यातून मानसिक ताण, लठ्ठपणा वाढलेला आहे. खूप कमी वयात आजार जडलेले अनेक तरुण निदर्शनास येतात. यातून कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही संकल्पना राबविली असल्याचे देशपांडे म्हणाल्या.

यासोबतच अनेकजण पोषक आहार घेत नाहीत. फास्ट फूड, पिझ्झा, बर्गरला अधिक पसंती देताना दिसून येतात. त्यामुळे घरगुती चुलीवरील जेवणाची परंपरा कुठे तरी मागे पडत चालली आहे. त्यामुळे चुलीवरील जेवण व घरगुती जेवणाकडे तरुणांनी आकर्षित व्हावे यादृष्टीने सजावटीतून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

पर्यावरणपुरक सजावटीद्वारे मैदानी खेळाद्वारे फिट अन् फाईन राहण्याचा संदेश दिला आहे. पर्यावरणपूरक सजावटीला लागणारे सर्व साहित्य स्वतः तयार करून सूंदर अशी सजावट त्यांनी साकारली आहे. यात सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळावा असा संदेशदेखील देण्यात आला आहे.

हे खेळ तरुण पिढी विसरली

मोबाईलच्या आहारी गेलेली तरुण पिढी लिंगोरच्या, कांदाफोडी, सूरपारंब्या, गोट्या व लंगडी हे खेळ पूर्वी सगळीकडेच खेळले जायचे. मात्र आताची पिढी खेळ विसरली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तूंचा वापर सर्रास वाढल्याचे प्रदूषण वाढले आहे. यामुळे पर्यावरणपूरक सजावटीची सुरुवात आपल्यापासून व्हावी यामुळे जनजागृती केल्याचे देशपांडे यांनी देशदूतशी बोलताना सांगितेल.

देशपांडे यांनी यापूर्वी साकारलेले देखावे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!