Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळा : परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान तर घरांची पडझड

Share

वाजगाव | वार्ताहर

देवळा तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मका, कांदे, बाजरी काढणीवर आलेले पिके आणि काढणी करून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक नुकसानीत सापडला आहे. तर दुसरीकडे बहुतांश घरांची पडझड झाल्याने यंदाच्या दिवाळीत साजरी करण्यासारखे काही नव्हते अशी प्रतिक्रिया येथील शेतकरी देत होते.

देवळा तालुक्यात गेली पंधरा ते वीस दिवसापासून हवामानात बदल होऊन गेली दोन दिवसापूर्वी दिवसभर धुक्याचे वातवर निर्माण झाले होते. परिणामी देवळा तालुक्याच्या पच्छिम व दक्षिण दिलेकडील डोंगरालागतच्या खेडोपाडी धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. यादरम्यान दिवसा अवघ्या वीस फुट अंतरावरील पाहणे अवघड झाले होते.

दिवसभर असलेल्या धुक्यातून कसाबसा दिवस जात असे आणि रात्री अचानक पावसाने शांतते दोन दिवस हजेरी लावून काढणी आलेले व काढणी करून शेतात असलेल्या पिकांचे मोठ्ये नुकसा झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक नुकसानीत सापडला आहे.

सुरुवातील पिके पेरणीच्या वेळी पावसाने उशीर केल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली तर आज काढणीवर आलेली पिके पावसात भिजत असून काढणी केलेल्या बाजरी व मक्याच्या कंसाला नवीन कोम फुटत आहे तर कांदे अति पाण्याने खराब होत असलेले पिके पाहून शेतकरी पूर्णता हतबल झाला आहे. याबाबत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

गेली दोन दिवसापासून निसर्गाने आपले आगळेवेगळे रूप दर्शवण्याचे काम हाती घेतले आहे. सकाळपासून दुपारपर्यंत सुर्यनारायण आग ओकताना दिसत आहे तर सायंकाळी पावसाने विजांच्या कडकडाट करत जोरदार हजेरी लावत आहे. यामुळे कांद्याचे रोप खराब होण्याचे प्रमाण वाढत आल्याने पाच ते सात हजार रुपये पायलीने विकत घेतलेली बियाणे शेतकऱ्यांच्या पुढील आशेची निराशा करतांना दिसत आहे.

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. त्यांनी टोलफ्री क्रमांकाला संपर्क साधून माहिती देवून आपली तक्रार रजि. करावी. टोलफ्री नंबरला संपर्क न झाल्यास विमा कंपनी प्रतिनिधीला नुकसानीच्या ४८ तासाच्या आत माहिती द्यावी. याच बरोबर पिक सूचना फॉर्म भरून कृषी विभागाकडे जमा करावे.

सचिन देवरे तालुका कृषी अधिकारी, देवळा,,,,,

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!