Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विनयनगरला स्फोट; सिलेंडर, वॉशिंग मशीन आहे त्याच स्थितीत; मग स्फोट कशाचा?

Share

इंदिरानगर | वार्ताहर

विनय नगर येथील दमयंती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या एका सदनिकेमध्ये आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्फोट होऊन विजेची उपकरणे जळून खाक झाली.

सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठा अपघात टळला असला तरी स्फोट नेमका कशामुळे झाला याचा अंदाज अग्निशामक दल तसेच पोलिसांनाही लावता आला नाही.

येथील दुसऱ्या मजल्यावर इगतपुरी येथील कृषी विभागाचे कर्मचारी आर. आर. पाटील कामासाठी बाहेर गेले होते. तर त्याचे कुटुंबीय भुसावळ येथे गेले होते.

आज दुपारी दोनच्या दरम्यान अचानक त्यांच्या घरात मोठ्या स्फोटाचा आवाज आला. बैठक खोलीत असलेले संगणक आणि इतर गॅझेट्स जळून खाक झाले.

दोन खोल्या सोडून असणाऱ्या बेडच्या बालकनीत देखील आग पोचली. आणि तेथील बाहेरची भिंत अक्षरशा मुख्य इमारतीपासून सुटून अलग झाली.

शेजाऱ्यांनी घराचे दरवाजे आणि कुलूप तोडून लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात शिंगाडा तलाव आणि सिडको येथील अग्निशामक दलाचे जवान देखील येथे पोचले, आग किरकोळ असल्याने तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले.

मात्र घरातील दोन सिलेंडर तसेच वॉशिंग मशीन आहे त्याच स्थितीत असल्याने नेमका स्फोट कशाचा? याबाबत पोलिस आता चौकशी करत आहेत. दरम्यान स्थानिक कार्यकर्ते प्रवीण जाधव, मंगेश ताडगे, समीर थोरात आदींनी ही आग विजवण्यासाठी सुरुवातीचे प्रयत्न केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!