Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : शिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Share

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. शहरातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. अनेक भागातील पुल आणि रस्ते बंद झाले आहेत.

शहरातील रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराजील जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे बाजारपेठा देखील बंद आहेत.

वेधशाळेने रात्रीपर्यत मध्यम आणि जोरदार सरींची शक्यता वर्तवला आहे. त्यामुळे दक्षतेचा भाग म्हणून  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी शिक्षण संस्थांना सुटी जाहिर केली आहे.

सकाळपासून पावसाचा जोर रात्रीप्रमाणेच कायम असून रविवारी (दि. ४) सुटी असल्याने पुर पहाण्यासाठी वेगवेगळ्या भागात गर्दी होत आहे.

यापार्श्वभूमीवर सर्व पुल आणि बंद झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाढती गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी कलम १४४ अन्वये जमावबंदी केली आहे.  पुर पाहाण्यासाठी गर्दी करू नये किंबहूना पावसामुळे घराबाहेरच निघू नये असे आवाहन यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!