Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हिंदू-मुस्लिम विसरा भेद, सांगून गेले कुराण-वेद..!; नाशिकमध्ये हिंदू मुस्लीम एकतेची वज्रमुठ

Share

नाशिक | प्रतिनिधी 

अयोध्येतील बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालयात आज पोलीस आयुक्त डॉ.विश्वास नांगरे पाटील यांनी हिंदू-मुस्लिम बांधवांची बैठक घेत शांतता राखण्याचा संदेश दिला. यावेळी हिंदू-मुस्लिम एकतेची वज्रमुठ दाखवण्यात आली. शहरात शांतता राखण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत, असे यावेळी सर्व बांधवांनी आश्वासित केले. याप्रसंगी मोठया प्रमाणात हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.

आज नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची बैठक पार पडली.  अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा संविधानाचा सन्मान असेल. जो निकाल असेल तो हिंदू किंवा मुस्लिम यांच्या बाजूने नाही तर भारताच्या बाजुने असेल. हा वाद बाबरी मशीद व राम मंदिराचा नाही. तर जमीनीचा वाद आहे हे लक्षात घेतले तर निकालानंतर काहीच होणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.


भारतीय म्हणून सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारणे ही नैतिक जबाबदारी आहे. निकाल केवळ एका जमिनीच्या खटल्याचा येणार आहे, हे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवावे.

हाजी वसीम पिरजादा, – बडी दर्गा विश्वस्त


मेरा मजहब अमन सिखाता है। भावी पिढीचं विचार गरजेचा आहे. चांगल्या विचारांचे पेरणी आहे. आपली जडणघडण आपण करायची आहे. सकारात्मक विचार गरजेचा आहे. अफवांना पसरवू देऊ नका. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ हीच आमची भाषा आहे.

विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!