Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर इगतपुरीत पुन्हा मुसळधार

Share

इगतपुरी | प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासुन विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सायंकाळच्या सुमारास पावसाने पुन्हा जोरदार मुसंडी मारत इगतपुरी, कसारा घाट परिसरात हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र तारांबळ उडाली होती.

मुसळधार पावसाबरोबर जोरदार वादळ सुटले. आजच्या पावसाने पुन्हा शहरातील जनजीवन विस्कळीत केले. तसेच हवेत गारवा वाढल्याने हुरहुरी भरल्यासारखे वाटत असल्याने नागरीकांनी घराबाहेर न निघणे पसंत केले आहे.

तर यावर्षी सरासरी पेक्षा सर्वाधिक ३९२९ मि. मीटर पावसाची नोंद झाली आत्तापर्यंत ११८ टक्के  पाऊस पडला असुन आणखीही पावसाचा एक महीना शिल्लक असल्याने मागील २० ते २५ वर्षाचा उच्चांक पार करतांना दिसत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!