Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार; पपया नर्सरी परिसरात २ तास वाहतूक कोंडी

Share

नाशिक | प्रतिनिधी

दिवसभराच्या उकाड्यानंतर आज सायंकाळी नाशिक शहर आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाची तीव्रता सातपूर, त्र्यंबकरोड परिसरात अधिक असल्यामुळे पपया नर्सरी परिसरात वाहतूक कोंडी झाली असून रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी शिरले होते.

मुसळधार पावसामुळे पाणी साचून याठिकाणी तलावाचे स्वरूप आले आहे,. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मागील दोन तासापासून खोळंबली आहे.

सातपुरला जोरदार पावसाने रस्ते तुडुंब

Deshdoot यांनी वर पोस्ट केले बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दोन किलोमीटर वाहनांची रांगा लागलेल्या पटेल स्वामी स्वामील दरम्यान पाणी श्रीराम चौक महिंद्रा सर्कल दरम्यानही पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने रस्त्याच्या एका बाजूला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तब्बल दोन तासांच्या विलंबानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जेसीबी द्वारे दुभाजक तोडून पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

द्र्माय्न, अर्ध्या तासानंतर पाण्याचा निचरा झाला मात्र वाहतुकीची कोंडी उशिरापर्यंत जैसे थे परिस्थितीत होती. घरी परतणाऱ्या तसेच त्र्यंबकला जाणाऱ्या शेकडो गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!