Video : नाशिकमध्ये गारांसह जोरदार वादळी पाऊस

0

गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या नाशिक शहरात आज अखेर मोठमोठ्या गारांसह वादळी पाऊसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेपाच पर्यंत शहरात ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दुपारी तीनच्या सुमारास वीजांचा कडकडाट आणि गारांसह हजर झालेल्या वरुणराजांमुळे बेसावध असलेल्या नाशिककरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

अवघ्या काही मिनिटांच्या पावसानंतर रस्त्यावर आणि मैदानांत ठिकठिकाणी पाणी साचले. पाऊस अजूनही सुरूच आहे.

शिवाजी स्टेडियम मैदानावर काही युवकांनी या पावसात भिजत मनसोक्त आनंद घेतला.

नाशिक जिल्ह्यातही कळवणसह काही भागात आज सकाळी पावसाने हजेरी लावली होती. दरी, मातोरी, मुंगसरे, म्हसरूळ आणि मखमालाबाद रोड परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

चांदवड तालुक्यातही दुपारी 2:30 वाजे पासून जोरदार पाऊस सुरू आहे.

दुपारी तीननंतर पिंपळगाव परिसरात गारांसह पाऊस पडला.

दिंडोरीतही जोरदार पाऊस झाला.

दरम्यान यंदा ३० मे रोजीच केरळच्या किनाऱ्यावर दाखल झालेल्या मॉन्सूनची आगेकूच सुरू असून ७ तारखेच्या दरम्यान तो राज्यासह नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*