Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावली. आजच्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मेघगर्जनेसह आज दुपारपासून कसमादे परिसरातील काही भागात, तसेच नांदगाव येवला परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.  आजच्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पेरण्या बळीराजा पूर्ण करणार आहे.

मागील काही दिवसापासुन विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री आठच्या शहरात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी सकाळ पासूनच उकाडा जाणवत होता, रात्री आकाशात अचानक पणे ढग दाटून आल्या वर पावसाची सुरवात झाली.

अचानक आलेल्या पावसाने व्यावसायिकासह नागरिकांची धावपळ उडाली, भाजी विक्रेत्याचा काही माल पावसात भिजला. काही दिवसाच्या विश्रांती नंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शुक्रवारी दिवस भर जाणवलेल्या उकाड्यानंतर रात्री आलेल्या पावसामुळे वातावरनात गारवा निर्माण झाला होता. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आजच्या पावसाने दिलासा दिला.

बागलाणमध्ये मुसळधार 

पावसाळा सुरु होऊन दीड ते पावणेदोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर अखेर वरूणराजाचे आगमन बागलाण तालुक्यात झाले. आजच्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहिल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. लवकरच याठिकाणी पेरण्यांना सुरुवात होणार आहे. तर काही ठिकाणी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आता दूर झाले आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वरुणराजाचे मनोभावे स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यात इथे झाला पाऊस

नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील देवळा तालुक्यातील खामखेडा, भऊर, भागात पावसाने हजेरी लावली.  तसेच नांदगावमध्येही मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे पावसाची रिपरिप अजूनही सुरु आहे.

मनमाडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच येवला तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

नाशिकच्या कोकणात मात्र पावसाची दांडी

नाशिकचे कोकण म्हणून समजल्या जाणाऱ्या त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यात पावसाची सर्वात जास्त तीव्रता असते. मात्र आजच्या पावसाने इगतपुरी आणि त्र्यंबक वगळता इतर जिल्ह्यात हजेरी लावल्यामुळे आजच्या पावसाने याठिकाणी हुलकावणी दिली आहे.

नाशिकरोड परिसरात विजेची बत्ती गुल

रात्री अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नेहमीप्रमाणे नाशिकरोडसह परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे.  याचा नागरिकांना त्रास सोसावा लागला विशेषत लहान मुलांना वीज नसल्याने वाढलेल्या डासांचा त्रास झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!