Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : अवघे नाशिक जलमय; शहरात ३३.४ मिलीमीटर पावसाची नोंद

Share
नाशिकरोड, नवीन नाशिक परिसरात अधिक प्रभाव
देशदूत डिजिटल टीम
आज दुपारपासून संततधार पाऊस सुरू झाला असल्यामुळे अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत. नुकत्याच प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार नाशिक शहर परिसरात अवघ्या दोन तासांत ३३.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
आजच्या पावसाचा अधिक प्रभाव नवीन नाशिक, सातपूर, अंबड, सीबीएस, नवीन सीबीएस, शालीमार, रविवार कारंजा, गंगाघाट परिसरात अधिक जाणवला. सायंकाळी शाळा महाविद्यालये, सुटण्याच्या वेळीच मुसळधार पावसाचे आगमन झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
देवळाली गाव येथील आठवडे बाजारातही भाजीपाला विक्रेते आणि ग्राहक यांची तारांबळ उडाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे बघायला मिळाले.
नाशिकरोड परिसरातील देवी चौक शिवाजी पुतळा देवळाली गाव विहितगाव राजवाडा गोसावीवाडी नाशिक रोड येथील बस स्टॅन्ड आंबेडकर रोड शिवाजी पुतळा नवले कॉलनी सिन्नर फाटा महसूल आयुक्त कार्यालय परिसर जेलरोड येथील काही ठिकाणचे रस्ते जलमय होऊन पाण्याखाली गेले.
शहरातील द्वारका ते नाशिकरोड परिसरातील सर्वाधिक रस्ते पाण्याखाली गेलेले दिसून आले.   अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती.  या संधीचा फायदा घेऊन रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करत पावसात अडकलेल्या प्रवाशांना लुटले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ उडवून नोकरदार वर्गानेही पावसात सापडला.
अंबड परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरले. अनेक कमी उंचीच्या घरांमध्ये सिडको परिसरात पाणी शिरले होते. उत्तम नगर परिसरातील खोलगट भागावर अधिक पाणी साचल्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सातपूरपरिसरातही पावसाच्या आगमनामुळे तारांबळ उडाली होती.
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या सीबीएस, रविवार कारंजा परिसरात बराच वेळ वाहतूक कोंडी बघायला मिळाली. सारडा सर्कल, गंजमाळकडे जाणारे मार्ग काही काळ वाहतूक कोंडीत सापडले होते. त्र्यंबक नाक्यावर गुलमोहराचे झाड कोसळल्यामुळे काही काळ याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!