Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

गोदावरीत महापूर परिस्थिती; नारोशंकराच्या घंटेजवळ पाणी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महापुराचे परिमाण मानल्या जाणाऱ्या नारोशंकराच्या घंटेच्या नजीक गोदावरीच्या पाण्याची पातळी पोहोचल्यामुळे गोदावरीला महापूर येण्याची शक्यता बळावली आहे.

जसे दुतोंड्या बुडाला की नाशिकच्या गोदावरीला पूर येतो असे म्हटले जाते. तसेच नारोशंकराच्या घंटेला पाणी लागले की गोदावरीत महापूर येतो असे म्हटले जाते.

गेल्या आठवडेभरापासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे नाशिकमधील सर्वच धरणांनी शंभरी गाठली आहे. अजून एक महिना पावसाळा असल्यामुळे धरणानातून प्रसंगावधान राखत विसर्ग करण्यात येत आहे.

सकाळी गंगापूर धरणातून २३ हजार क्युसेक पेक्षा अधिक पाणी गोदापात्रात सोडल्यामुळे नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुढे हा विसर्ग नाशिकमध्ये दाखल होत असताना पाण्याची पातळी जवळपास ३० ते ३५ टक्क्यांनी वाढते. त्यामुळे सध्या नारोशंकराच्या घंटेला पाणी लागण्याची शक्यता असून जर अजून विसर्ग सोडण्यात आला तर नाशिकमध्ये गोदावरीला महापूर येण्याची दाट शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!