Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : कुठे झाड उन्मळले तर कुठे विजेचे खांब वाकले; येवल्यात वादळी पावसाने धांदल

Share

नाशिक | प्रतिनिधी 

येवला तालुक्यात पूर्वमोसमी पावसाने दाणादाण उडवली. मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले होते. तालुक्यातील राजापूर ,ममदापुर, सायगाव, या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या आगमनाने दिलासा तर मिळाला मात्र, अचानक आलेल्या पावसाने अनेकांची धांदल उडवली.

तालुक्यातील ममदापुर देवदरी खरवंडी व रेंडाळे येथे वादळी वारे सह पावसाची सुरवात झाली.  वादळी वाऱ्यांचा जोर एवढा होता की रेंडाळे येथे सात ते आठ घरांचे पञे उडून संसार उपयोगी वस्तुचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यथील कचरू राऊत यांच्या घराचे पञे उडून त्याच्या अंगावरती पाञ्याचे शेड कोसळून जखमी झाले आहेत. त्याना उपचारासाठी येवला येथे हलवण्यात आले.

वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून पडले आहेत. जळगांव नेऊर, जऊळके येथे पावसाची तीव्रता अधिक होती. धामोरी येथेही जोरदार वारासह पावसाने हजेरी लावली.

नगरसूल परिसरात मेघगर्जनेसह बेमोसमी पावसासह तूरळक गाराही पडल्या. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने आठवडे बाजार असल्याने या पावसाने दुकानदारांची आणि ग्राहकाची मोठी धांदल उडाली.

बाजारासाठी परीसरातील खेड्या पाड्यातील अनेकजन आले होते. ऐन बाजार भरण्याच्या वेळीच वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्यामुळे बाजार भरलाच नाही.

येवला तालूक्यातील राजापूर दूपारी तीन वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वार्यासह विजांचा कडकडाट व गाराचा पाऊस सुरू झाला.

सगळीकडे एकच तारांबळ उडाली होती. पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने थोडाफार थंडावा निर्माण झाला. अन शेतकरयाकडे थोडयाफार प्रमाणात असलेला जनावरांचा चारा भिजल्याने शेतकरी वर्गाची एकच धावपळ उडाली.

काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तूटून पडल्या आहेत. उद्यापासून मृग नक्षञ लागणार असल्याने वरून राजाने आदल्या दिवशी हजेरी लावली यामुळे हरिण, मोर व वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी डोंगरात पाणी उपलब्ध झाले आहे. पाऊस उघडल्यानंतर चारा झाकण्यासाठी शेतकरीवर्गाची धावपळ उडाली होती.

येवला तालुक्यातील पावसाची फोटोगॅलरी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!