Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दुष्काळाची दाहकता; मेंढ्यांना खाऊ घालावा लागतोय लिंबाचा पाला

Share

पाटोदा | वार्ताहर

येवला तालुक्यात दुष्काळाचे चटके माणसासोबत जनावरांनाही बसताना दिसून येत आहेत.  पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले असतानाच शेळ्या मेंढ्यांसह चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मेंढपाळ शेतातील उभ्या असलेल्या लिंबाच्या झाडांचा पाला तोडून मेंढ्यांना खाऊ घालत असल्याचे विदारक दृश्य नजरेस पडले आहे.

खायला मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांना लिंबाच्या झाडाच्या पाल्यावर गुजराण करण्याची वेळ आल्याचे मेंढपाळ सांगतात. पाटोदा परीसरातील सर्वच गावामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मेंढ्या आहेत, ते पशुपालक चाऱ्याअभावी लिंबाच्या झाडाचा डहाळा करून जनावरांना खाऊ घालत आहेत.  तर लिंबाच्या पाल्याची चव कडू असूनही मेंढ्या हा पाला खातात त्यामुळे लिंबाच्या पाल्यावर गुजराण करावे लागते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!