‘देशदूत’च्या आरोग्य महोत्सवाला देवळा येथे उत्तम प्रतिसाद

‘देशदूत’च्या आरोग्य महोत्सवाला देवळा येथे उत्तम प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी 

देवळा- सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित देशदूतच्या आरोग्य महोत्सवाला देवळा येथे उत्तम प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष ज्योस्ना आहेर, जि. प. सदस्या नूतन आहेर, देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्राचार्य मालती आहेर, मुख्याध्यापिका उषा बच्छाव देशदूतचे महाव्यवस्थापक आर. के. सोनवणे यांच्या उपस्थितीत आरोग्य महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

देवळा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हा आरोग्य महोत्सव झाला. नामको हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी महिला व मुलींची तपासणी करून मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले. यावेळी आयोजित बचत गटांच्या जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशदूतच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. पुढील आरोग्य महोत्सव दि 18 जानेवारी रोजी उमराने ता देवळा येथे होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com