भरदिवसा घरफोडी करणारा सराईत शिताफीने जेरबंद; ग्रामीण पोलिसांची कारवाई

0
नाशिक | गेल्या काही दिवसांपूर्वी वणी परिसर तसेच नाशिक शहरात झालेल्या घरफोडीच्या घटनेतील मुख्य सूत्रधार नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत जेरबंद झाला आहे. नाशिक शहरातील वडाळा गाव परिसरात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार रात्रभर पाळत ठवून सापळा रचला. या कारवाईत सराईत रामेश्वर गद्रे यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत होते. बुधवारी (दि.०८) स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वणी व नाशिक शहरात विविध घरफोड्यातील गुन्हेगार नाशिक शहरातील अशोका मार्ग, वडाळा गाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर अशोका मार्ग व पखालरोड परिसरात रात्रभर सापळा रचुन संशयित  रामेश्वर मोतीराम गर्दे, (वय 25, रा. अशोका मार्ग, हिरेनगर, नाशिक) यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार अमीन मन्सुरी बादशहा, (रा. गांधीनगर, गुजरात) याच्यासह गेल्या आठवड्यात वणी गावातील लंखेश्वर मंदिर परिसरात तसेच नाशिक शहरातील धात्रक फाटा व मेरी कॉलनी परिसरात बंद घराची कडी कोयंडा तोडुन घरफोडया केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, संशयितांच्या ताब्यातून काळ्या रंगाची मारुती कार क्र. एम.एच.04. बीडब्ल्यु 7128 तसेच 1 मोबार्इल, असा एकुण 3 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित गर्दे हा सरार्इत गुन्हेगार असुन त्याच्याविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो मध्यवर्ती कारागृहात असतांना त्याचा साथीदार अमीन मन्सुरी याच्यासोबत ओळख झाली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी मिळून घरफोड्या घातल्याचे निष्पन्न झाले. 

गर्देचा साथीदार अमीन मन्सुरीचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्याकडून अजून काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, पोहवा दिपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राउत, गणेश वराडे, पोना अमोल घुगे, पोकॉ हेमंत गिलबिले, विश्वनाथ काकड, प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील कामगिरी केली.

LEAVE A REPLY

*