Type to search

नाशिक

पाऊले चालती शिर्डीची वाट

Share

गुळवंच (वार्ताहर) : येथील श्री दत्त साई सेवा मंडळ तर्फे गुळवंच-शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी शिर्डीकडे कूच केली.

सकाळी ८ वाजता गुळवंच येथील साई मंदीरात पंचायत समिती सदस्य रोहिणी कांगणे यांनी परिवारासह साईमुर्तीची पुजा केली.

त्यानंतर पालखी मिरवणुक पार पडली यानंतर पालखी शिर्डीकडे रवाना झाली. दुसऱ्या दिवशी साई पालखी परतल्यानंतर सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव होणार असून ह . भ . प . पुरुषोत्तम महाराज घुमरे यांचा सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम होईल. तसेच भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!